माजरी च्या केंद्रीय विद्यालयाची विद्यार्थिनीभावना पुसदेकर महिला भारतीय 'नौसेना'मध्ये दाखल.भावा च्या पाठोपाठ बहिण ही भारतीय नौसेनेत भरती

माजरी च्या केंद्रीय विद्यालयाची विद्यार्थिनी
भावना पुसदेकर महिला भारतीय 'नौसेना'मध्ये दाखल.
भावा च्या पाठोपाठ बहिण ही भारतीय नौसेनेत भरती

वरोरा 
खाबांडा प्रतिनिधी

चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी येथील केंद्रीय विद्यालयात बारावी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या नारायणपूर (झोटिंग) येथील भावना संजय पुसदेकर हिची भारतीय "नौसेना" निवड झाली भावा पाठोपाठ बहिणींच ही भारतीय "नौसेना"  निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. 
  
 
खाबांडा येथुन जवळच असलेल्या नारायणपूर ( झोटिंग) येथील संजय पुसदेकर यांची कन्या भावना ही वर्धा जिल्ह्यातील पहिली महिला अग्नीवर ठरली आहे. भावना संजय पुसदेकर नौसेनेत एस एस आर मध्ये अग्नीवर बनली आहे.तीने दहावी पर्यंतचे शिक्षण हिंगणघाट येथील सेंट जान हायस्कूल तर बारावी केंद्रीय विद्यालय डब्ल्यूसीएल माजरी (जि चंद्रपूर ) तर पदवी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथे बी एससी,बिएड पुर्ण करून भारतीय नौसेनेत तीची निवड झाली आहे.

भावनाचा मोठा भाऊ भारतीय नौसेनेत कार्यरत असून त्याच्या प्रेरणेने तिने नौसेनेत प्रवेश घेतला.
ओडीसा आय. एन. एस.चिल्का व कारवार मध्ये आय एन एस विक्रमादित्य जहाजांमध्ये यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केले. तिने यापूर्वी हिंगणघाट मध्ये जय जवान अकॅडमीमध्ये भरतीपूर्व प्रशिक्षण घेतले होते. 
संचालक सतीश तिमांडे ( भारतीय सेना) व सर्व विद्यार्थिनी व मित्रमंडळीनी भावनाचे स्वागत करून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.


Comments