वरोरा
चेतन लूतडे
वरोरा शहराजवळ लागून असलेल्या परसोडा या गावालगत महामार्गावरील दुकानांची लाईन गेल्या दोन दिवसापासून नसल्याने हॉटेल मालकांना नुकसान सहन करावे लागत आहे.
26 तारखेच्या रात्री पावसामुळे विद्युत वितरण कंपनीच्या जंगली भागात तारां तुटल्याचे कारण सांगत विद्युत खोळंबा झाला होता. यानंतर दिनांक 26 ,27, आणि 28 तारीख सकाळी 11 वाजेपर्यंत ही लाईन आलेली नाही. विशेष म्हणजे परसोडा गावातील लाईन आलेली आहे. या परिसरात कॉलेज आणि हॉटेल मालक वारंवार लाईन नल्यामुळे चिंतेत असून हॉटेल मालकांना रोजचे नुकसान सहन करावे लागत आहे. हा प्रकार बऱ्याच वर्षापासून सुरू असून खेडे विभागातील लाईन येण्या जाण्यामुळे विद्युत उपकरणे खराब झाली आहे. सध्या परीक्षेचे दिवस सुरू आहेत. प्रॅक्टिकल व इतर कामासाठी लाईटची नितांत गरज असते मात्र ही बाब महावितरण कंपनी समजू शकत नाही. मेंटेन्शनच्या नावाखाली वर्षभरात बिले मात्र लाखोच्या घरात निघतात. मात्र दुरुस्ती कुठली होते हे अजून पर्यंत कळायला मार्ग नाही. नवीनच सुरू झालेले हॉटेल किंग सावजी चे मालक रोहन खणके यांनी आपली व्यथा मांडली असून हा रोजचा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे हॉटेल मालक, कॉलेज मालक, यांच्यातर्फे विद्युत पुरवठा हा वरोरा शहराला जोडून देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला संपर्क साधला असता लाईट थोड्या वेळात येऊन जाईल असे उडवा उडवी चे उत्तर देऊन टाईमपास करणे सुरू आहे.
हि लाईन शेतीची तर नसेल ना अशी शंका येत असून शेतकऱ्याला विद्युत पुरवठा करणारी लाईन शाळा कॉलेजला देण्यात आल्याची चर्चा होत आहे.
त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन या परिसरातील लाईन सुरु करावी अशी मागणी केली आहे.
Comments
Post a Comment