आनंद निकेतन महाविद्यालयात मोबाईल सिनेमा मेकिंग वर्कशॉप संपन्न

आनंद निकेतन महाविद्यालयात मोबाईल सिनेमा मेकिंग वर्कशॉप संपन्न


वरोरा-२२/४/२३
प्रवीण मुधोळकर

अलीकडच्या काळात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल आणि त्यातील विविध कलात्मक प्रकारांचे  आकर्षण निर्माण झालेले आहे. या आकर्षणाला सृजनशील निर्मितीमध्ये परिवर्तित करण्याच्या उद्देशाने आनंद निकेतन महाविद्यालय येथे  मोबाईल सिनेमा मेकिंग वर्कशॉप या विषयावर  दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभाग आणि अटल इनोवेशन अॅंड  इनक्यूबेशन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने  करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध विभागाचे विध्यार्थी आणि प्राध्यापक सहभागी झाले होते. 
कार्यक्रमाचे उद्घघाटन  प्राचार्य डाॅ. मृणाल काळे यांचे हस्ते दिपप्रज्वलनाने झाले. कार्यक्रमाचे संचालन कु. निकीता माणूसमारे  हीने केले.  या कार्यशाळेत  प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक प्रसाद नामजोशी यांनी सिनेमा निर्मितीची प्रक्रिया व तंत्रज्ञान ,विषयाची निवड सिनेमाचे  चित्रीकरण करताना घ्यावे लागणारे विविध शॉट्स आणि अँगल्स याबाबत प्रात्यक्षिकासहीत माहिती दिली. मोबाईल तंत्रज्ञानाद्वारे समाज माध्यमांचा व्यावसायिक उपयोग , या क्षेत्रातील संधी आणि आव्हाने याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आनंद निकेतन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी म्हणून आपल्या भूतकाळातील प्रतिकूल परिस्थितीच्या आठवणींना उजाळा दीला. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना पूर्वीपेक्षा महाविद्यालयातून भरपूर सुविधा उपलब्ध आहेत या  सुविधांचा उपयोग   विद्यार्थ्यांनी आपल्या  व्यक्तिमत्व विकास आणि कौशल्यनिर्मितीसाठी करावा अशी  अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या  प्रसंगी काही विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केले. 
कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मृणाल काळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर प्रसाद नामजोशी तसेच समाजशास्त्र विभाग प्रमुख  डॉ.रंजना लाड या उपस्थित होत्या.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी प्रस्तुत केलेल्या मनोगतांचा उल्लेख करीत प्राचार्य डॉ.मृणाल काळे यांनी हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये नवनिर्मितीसाठी प्रेरणा  देईल अशी आशा व्यक्त केली.
विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाचा उपयोग आपला अभ्यास विषय समजण्यासाठी देखील करून घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.कार्यक्रमाचे संचालन डॉ.पल्लवी ताजने यांनी तर प्रास्ताविक डॉ.रंजना लाड यांनी तर आभार प्रदर्शन  प्रा.प्रवीण मुधोळकर   यांनी केले.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा.मोक्षदा मनोहर,  प्रा. प्रमोद सातपुते प्रा.अमोल ठमके, प्रा.हर्षल चौधरी प्रा.हेमंत परचाके, प्रा.तिलक ढोबळे यांनी अथक परिश्रम घेतले

Comments