वर्धा पावर विद्युत निर्मिती प्रकल्पात कोळशासोबत बायोमॉस वापरण्याला सुरुवात * कोळशाची बचत आणि कार्बनडाय ऑक्साइडवर नियंत्रण

वर्धा पावर विद्युत निर्मिती प्रकल्पात कोळशासोबत बायोमॉस वापरण्याला सुरुवात 
* कोळशाची बचत आणि कार्बनडाय ऑक्साइडवर नियंत्रण
 वरोरा:  येथील औद्योगिक वसाहत क्षेत्रामध्ये असलेल्या साई वर्धा पावर जनरेशन प्रा. ली. या विद्युत निर्मिती प्रकल्पात कोळसा आणि बायोमासचे मिश्रण करून विद्युत निर्मिती करण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे कोळशाची बचत आणि वातावरणात सोडल्या जाणाऱ्या कार्बनडाय ऑक्साइड वायूच्या प्रमाणावर नियंत्रण येणार असल्याचे म्हटले जात आहे.  केंद्र शासनाच्या विद्युत मंत्रालयाने आणलेल्या समर्थ मिशन योजनेनुसार कोळशावर चालणाऱ्या विद्युत निर्मिती प्रकल्पात कोळशासोबतच ७ टक्के बायोमासचे मिश्रण करून विद्युत निर्मिती करण्याचे निर्देश सर्व संबंधित विद्युत निर्मिती केंद्रांना देण्यात आले होते. त्याचे तंतोतंतपालन वरोरा औद्योगिक वसाहत क्षेत्रामध्ये असणाऱ्या साई वर्धा पावर विद्युत निर्मिती केंद्राने केले आहे. साई वर्धा पावर जनरेशन प्रायव्हेट लिमिटेड या विद्युत निर्मिती प्रकल्पात १३५ मेगावॅट वीज निर्मितीचे चार संच आहेत. या केंद्रातुन ५४० मेगावॅट विद्युत निर्मिती होत असते. सदर विद्युत निर्मिती करणाऱ्या केंद्राने कोळशासोबत ७% बायोमास प्लेट्सचे यशस्वी प्रज्वलन करून विद्युत निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे कोळशाची बचत होत होणार असून त्यासोबतच वातावरणात सोडल्या जाणाऱ्या कार्बन डाय-ऑक्साइड वायूच्या प्रमाणावर देखील नियंत्रण मिळविले गेले आहे.

Comments