तहसीलदारांना कापूस भेट
७ दिवसात मागण्या निकाली काढा अन्यथा लोटांगण आंदोलन
वरोरा
वरोरा तालुक्यातील विविध समस्या घेऊन प्रहार संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी ७ वर्षांपासून ट्रामा केअर ची इमारत रुग्णाविना आजारी पडली आहे. यात डॉक्टर, कर्मचाऱ्यांची पदभरती भरून तात्काळ सुरु करावी. कापसाला ७ हजार रुपये भाव देऊन सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. अवैध रेती तस्करांच्या वाहनाने रस्ताची वाट लागली. आदी मागण्याचे निवेदन तहसीलदार स्नेहल रहाटे यांना देण्यात आले. यावेळी निवेदन कर्त्यांनी तहसीलदार यांना कापूस भेट देत ७ दिवसात मागण्या मंजूर न झाल्यास तहसील कार्यालय ते ट्रामा केअर पर्यंत लोटांगण आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देतांना प्रहारचे तालुका अध्यक्ष किशोर डुकरे, सह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते
श्री बालाजी ऍग्रो इंडस्ट्रीज, येन्सा, टेमुर्डा.
आजचे बाजार भाव
कपास-- 6950
सोयाबिन-4621
तुअर ___8001
चना-- 4551
चनोली--5500
लाखी--3100
( आर्द्रता 10 % )
पर्यंत ...
धन्यवाद
============== =========================
टीप :- नगदी रक्कम(चुकारा) करिता सातबारा
अनिवार्य आहे.
धन्यवाद...................
Comments
Post a Comment