शहीद डाहुले चौकात लालपरी फेल
शहरातील वाहतुकीचा खोळंबा.
वरोरा
चेतन लूतडे
वरोरा आगार येथून निघालेली अहेरी डेपोची लाल परी भर चौकात बिघडल्याने वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला. शहीद डाहूले चौकामध्ये तीन वाजताच्या दरम्यान वरोरा आगारामधून बस क्रमांक एम एच 40 वाय 5970 ला विभागीय कार्यशाळा चंद्रपूर येथे नेण्यासाठी जुगाड तयार करून बस- ट्रकला बांधून नेण्यासाठी काढण्यात आले. मात्र वरोरा आजारातूनच निघालेला बस ट्रक चे जुगाड शहीद डावले चौकात जाऊन रस्त्याच्या मधोमध तुटले आणि तेव्हापासून ही बस या चौकाच्या थांबून आहे.
वरोरा आजाराचे व्यवस्थापक ही बस हलवण्यासाठी नवीन प्रयत्न करून राहिलेले आहे. मात्र संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत प्रयत्न असफलच ठरले. या गाडीची पाहणी करण्यासाठी आगाराचे कर्मचारी ठेवण्यात आले आहे. मात्र नवीन जुगाडाची वाट पाहून पाहून तेही थकले. यामुळे वरोरा शहरात जाणारा रस्ता वरील वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून लवकरात लवकर बस हलवावी असा प्रयत्न सुरू आहे.
या गाडीची इंजन पूर्णतः खराब झाले असून दुसरी बस किंवा ट्रक येईल तोपर्यंत लाल परी शहीद डावले चौकात मुक्काम करणार.
ट्राफिकला जरी अडथळा निर्माण झाला असला तरी ट्राफिकचे कोणतेही नियम या लाल परीला दिसत नाही. साधे रेडियमचे स्टिकर सुद्धा दिसत नाही. एरवी साधी गाडी जरी बंद पडली तरी महामार्गावरील पोलीस किंवा ट्राफिक पोलीस विचार ना तरी करतात.
मात्र आगार व्यवस्थापक डोंगरकर यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता वेल्डिंग साठी कर्मचारी शर्तीचे प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.
मात्र गेल्या चार तासापासून ही गाडी या ठिकाणी आहे आणि संबंधित प्रशासनाचे मात्र अजूनही लक्ष नाही.
पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर साडेआठच्या सुमारास ही बस इथून काढण्यात आली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
Comments
Post a Comment