डॉक्टर सागर वझे यांचा भाजप पक्षात प्रवेश


डॉक्टर सागर वझे यांचा भाजप पक्षात प्रवेश

वरोरा
चेतन लूतडे

वरोरा शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर म्हणून नामांकित असलेले सिनेट सदस्य डॉक्टर सागर वझे यांची ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते भाजप पक्षात प्रवेश घेण्यात आला.
यानंतर पक्षातील महत्त्वाची जबाबदारी सुद्धा त्यांना देण्यात येणार असल्याचे सांगितले गेले. त्यामुळे वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात भाजपाची ताकद वाढली असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये अनेकांचे भाजप प्रवेश होतील असा विश्वासही त्यांनी  व्यक्त केला.

भारतीय जनता पार्टी द्वारा मिशन २०२४ अंतर्गत मोदी @९ जनसंपर्क अभियान दि. ३० मे २०२३ पासून राज्यभरातील सर्व लोकसभा मतदार क्षेत्रात सुरु करण्यात येत असून चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे अभियान संयोजक म्हणून पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने नियुक्ती केली आहे. प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ९ वर्ष पूर्ण होत असल्याने सरकारची उपलब्धी गोरगरीब सर्वसामान्यांच्या हितासाठी केलेले कार्य, विविध महत्वाकांक्षी योजना, शेतकरी कामगार, युवक, महिलांसाठीच्या विविध योजनांची उपलब्धी, मोदी सरकारचे राष्ट्रोन्नतीचे कार्य या सर्व उपलब्ध्या घेवून समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न या जनसंपर्क अभियानातून केला जाईल असे हंसराज अहीर यांनी म्हटले आहे. महिनाभराच्या या महासंपर्क अभियानाअंतर्गत लोकसभा क्षेत्रातील सर्व विधानसभा क्षेत्रात पत्रकार परिषदा, विशाल रॅली, सोशल मिडीया बैठका, व्यापारी सम्मेलने, विविध क्षेत्रातील प्रबुध्द नागरीकांचे सम्मेलन व अन्य कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न या अभियानातून होणार आहे.
यानंतर वरोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाजप प्रवेश घेतल्या जाणार असल्याचीही त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी वरोरा तालुक्यातील भाजपाचे तालुकाध्यक्ष भगवान गायकवाड, सुरेश महाजन, मधुसूदन टिपले, राहुल बांदुरकर, विनोद लोहोकरे आदी कार्यकर्ता स्थानिक विश्रामगृह वरोरा येथे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Comments