चार तासात दोन चोरटे गजाआड एक फरार
वरोरा
सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घराला कुलूप लावून शेजाऱ्याकडे बसावस गेले संध्याकाळी सहा वाजता घरी येतात पुढील दरवाज्याचे कुलूप तुटलेले दिसले घरात बघितले असता घरातील सहा लाख 85 हजाराचे सोन्याचे दागिने व रोख चोरट्यांनी लंपास केल्याची दिसून आले वरोरा पोलिसात तक्रार देतात पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने अवघ्या चार तासात हिंगणघाट येथून दोन चोरट्यांना ताब्यात घेतले एक चोरटा फरार झाला त्याचा शोध वरोरा पोलीस घेत आहे
वरोरा शहरालगतच्या आनंदवन परिसरातील त्रिमूर्ती नगर येथे वास्तव्यास असलेले सुदाम लहानु खिरटकर यांच्या घरातील सदस्य बाहेर गेले होते 28 जून रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास सुदाम खिरटकर यांच्या पत्नी घराला कुलूप लावून शेजाऱ्याकडे बसावस गेले सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास त्या घरी आले असता घराच्या दरवाजाचे कुलूप तुटून दिसले घरात प्रवेश केला असता कपाटातील सोन्याची दागिने व रोख रक्कम असा सहा लाख 85 हजार रुपये चोरी गेल्याचे आढळून आले वरोरा पोलिसांकडे तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन घटनास्थळाजवळचे सीसी टीव्ही फुटेंची पाहणी केली त्यात चोरट्यांचे चेहरे स्पष्ट आले त्यानंतर आनंदवन चौकात वरोरा पोलीस स्टेशन तर्फे लावण्यात आलेले सीसीटीव्ही पाहणी केली असता चोरटे दुचाकी वाहनाने नागपूर दिशेने गेले असल्याचे दिसून आले वरोरा पोलिसांनी हिंगणघाट येथे जाऊन विशाल उर्फ बबलू गायकवाड व 32 राम पवार वय 26 या दोघांना अवघ्या चार तासात ताब्यात घेतले त्यांच्याकडून दीड लाख रुपयांचा ऐवज जप्त केला यामधील एका चा समावेश असलेल्या आरोपीचा वरोरा पोलीस शोध घेत आहे घरफोडी करणाऱ्या तिघांवरही नागपूर वर्धा जिल्ह्यात अनेक घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे चोरट्यांनी गुन्ह्यात वापरलेली बजाज पल्सर पोलिसांनी ताब्यात घेतली.
सीसीटीव्हीमुळे चोरटे गवसले
दुसऱ्या जिल्ह्यातील अट्टल चोरटे दुचाकी वाहनाने येऊन दिवसा व रात्री घर फोड्या करीत असल्याचे दिसून येत आहे चोरटे दुसऱ्या जिल्ह्यातील असल्याने त्यांना तात्काळ ओळखणे अवघड असते दुसऱ्या जिल्ह्यातील चोरट्यांनी वरोरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हायवे लगतच्या घरांना लक्ष केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी घराच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावून घ्यावे असे आव्हान परीक्षा विधी न उपविभागीय पोलीस अधिकारी तथा वरोरा पोलीस स्टेशनचे प्रमुख योगेश रांजणकर यांनी केले आहे सदर घटनेचा तपास वरोरा पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक किशोर मित्तलवार व त्यांचे सहकारी करीत आहे.
Comments
Post a Comment