सॅनिटायझर किट व साहित्य खरेदी प्रकरणातील शहानिशा करण्याचे बिडिओ दिले आदेश.

हँडवॉश किट व साहित्य खरेदी प्रकरणातील 
शहानिशा करण्याचे बिडिओ दिले आदेश.

कोविड संसर्गजन्य महामारी पासून उपाय योजना करणे आवश्यक.

शाळेतील लहान मुलांना स्वच्छतेच्या सवयी लागणे आवश्यक आहे.

वरोरा :
चेतन लूतडे 

 ग्रामपंचायत स्तरावरील २०२०-२१ ते २०२२-२३ अंतर्गत १५ वा वित्त आयोग निधी तसेच सामान्य फंड निधीचे ग्रामपंचायत खरेदीचे अधिकार डावलून आणि ग्रामसेवकांना विश्वासात न घेता किंवा कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविता वरोरा तालुक्यातील ८१ ग्रामपंचायत, शाळा, प्रा. आ. केंद्रे, उपकेंद्रे व अंगणवाड्यांसाठी बाजारभावापेक्षा जास्त दराने हॅन्डवॉश सेट आणि इतर तत्सम साहित्य खरेदी करण्याचा तसेच त्या माध्यमातून ३२ लाख ४० हजार रुपयांचा गैरव्यवहार करण्याचा पराक्रम वरोरा पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप सोसायटी फॉर फास्ट जस्टीस विदर्भ या संघटनेने विभागीय आयुक्त नागपूर यांच्याकडे तक्रारीतून केला असून चौकशी व कारवाईची मागणी केली आहे. 
या मथळ्याखाली दै.वर्तमानपत्रांमध्ये बातमी झळकवण्यात आली होती.
 यामध्ये अधिकाऱ्यांना टार्गेट करत साहित्य खरेदीमध्ये गैरव्यवहार केला असल्याचा आरोप सिंदेवाही येथील संघटनेने केला होता.

यामागे काहीतरी राजकारण शिजले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.71 पैकी फक्त 24 ग्रामपंचायत मध्ये जे साहित्य पुरवण्यात आले त्याचा सिंदेवाही येथील संघटनेचा काय संबंध आहे हे अजून पर्यंत कळायला मार्ग नाही.
यांना जे बिल मिळाले ते बिल कोणत्या गावचे आहे. येथील ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक कोण होते. यावरून  या प्रकरणाचा शोध लागू शकतो. 
मुळात साहित्य खरेदी करण्याचा अधिकार फक्त ग्रामपंचायतीला दिला आहे. पंधरावा वित्त आयोगातून जर असेल तर तो आराखड्यात नमूद असायला पाहिजे. किंवा सामान्य फंडातून खरेदी करण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला  दिलेला आहे.

कोविड नंतर प्रशासनाने महामारीवर आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतींना हॅन्ड वॉश व इतर साहित्य खरेदी करून गावातील जनतेची सुरक्षा युद्ध स्थळावर झोपासावी असे सामान्य मीटिंगमध्ये कळविण्यात आले होते. त्यानुसार २४ ग्रामपंचायत संस्थेने हँडवॉश किट वरोरा तालुक्यात खरेदी केलेल्या आहेत. याची शहानिशा व दर्जा तपासणीचे अधिकार विस्तार अधिकाऱ्यामार्फत बिडीओ यांनी स्वतः दिले आहे. 
आता ग्रामसेवक व सरपंच यांच्या मर्जी शिवाय हे साहित्य खरेदी होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांची सुद्धा चौकशी होणे तितकेच गरजेचे आहे.

बिडिओ सोबत बोलताना सांगितलं की, पंचायत स्तरावर असे साहित्य खरेदी करण्याचे व्यवहार आम्हाला नाही. त्यामुळे या प्रकरणात असले कुठलेही आदेश पंचायत समिती स्तरावरून दिलेले नाहीत. मात्र शासन स्तरावरील कुठलीही चौकशी न करता अशा पद्धतीच्या बातम्या देने संयुक्तिक ठरत नाही. किंवा ठेकेदार ठरवण्याचा अधिकार सुद्धा नाही.

सॅनिटायझर किट व साहित्य ग्रामपंचायत जवळ असणे  आवश्यक असून प्राथमिक केंद्र अंगणवाडी , शाळा शहरापासून दूर असलेल्या खेड्यामध्ये कोविड संसर्ग व उपाय योजना करणे आवश्यक असते. आणि लहान मुलांना स्वच्छतेची सवय असली पाहिजे या दृष्टिकोनातून साहित्य खरेदी करू शकतात. 
24 ग्रामपंचायत मधून काही सरपंचांना संपर्क साधला असता गावाच्या स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून हँडवॉश किट घेण्यात आलेले आहे. असे कळवण्यात आले.


ठेकेदारामार्फत चे साहित्य २४ ग्रामपंचायतीमध्ये पुरवण्यात आले आहेत त्यामध्ये 19 प्रकारचे वेगवेगळे साहित्य असून त्याची  पहाणी सुरू असून शोष खड्डे , मेटल वॉटर टँक इत्यादी साहित्याची शहानिशा करण्यात येणार आहे.  
याचप्रमाणे गावातील विविध योजनेची माहिती संबंधित ग्रामसेवकाकडून घेतली जाणार असल्याचे कळले. त्यामुळे कुठलाही आर्थिक गैरव्यवहार झाला नसून या संस्थेच्या मागून कोणीतरी मागील घडामोडीचा बदला घेण्यासाठी राजकारण करत असल्याची चर्चा होत आहे.

आज मंगळवारी 13 जून ला यासंदर्भात पुन्हा दैनिक वृत्तपत्रात बातमी आली असून हे आरोप निरर्थक असल्याचे म्हटले आहे.

Comments