एक जुलै डॉक्टर दिनाचे औचित त्यावर कर्करोग निदान शिबिर
वरोरा
चेतन लूतडे
स्वर्गीय विनायकराव वझे स्मृती प्रित्यर्थ सुयोग
हॉस्पिटल वरोरा, भारतीय जनता पार्टी,व रोटरी क्लब, वरोरा, यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मॅमोग्राफी टेस्ट मॅमोग्राफी टेस्ट शिबिराचे आयोजन १जूलै ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे घेण्यात येत आहे.
महिलांमधील वाढत्या कर्करोगाचे प्रमाण लक्षात घेऊन वरोरा व भद्रावती तालुक्यातील गरजू लोकांसाठी महिलांमधील स्तनाच्या कर्करोगाची तपासणी व निदान शिबिर उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे १ जुलै ते ५ जुलै २०२३ रोजी सुरू होत आहे. यासाठी ३५ते ६० वयोगटातील महिलांसाठी गरजू महिलांनी सकाळी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे नोंदणी करून तपासणी साठी यायचे आहे.
प्रत्येक दिवशी तज्ञ डॉक्टर कडून महिलांसाठी मोफत कर्करोग तपासणी व निदान सकाळी १०.०० ते २:०० पर्यंत करण्यात येणार आहे.
आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या विशेष सहकार्याने स्वर्गीय विनायकराव वझे स्मृतिप्रित्य सुयोग हॉस्पिटल वरोरा, बीजेपी पक्ष, व रोटरी क्लब वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर दिनाच्या औचित त्यावर डॉक्टर सागर वझे यांनी या शिबिराचे आयोजन केले आहे.
अधिक माहितीसाठी नितेश जयस्वाल 9822942186 मधुकर फूलझेले 9923740741, विशाल जाजू 9822576661 , शब्बीर बोहरा 9921031252 यांच्यासोबत संपर्क साधावा.
Comments
Post a Comment