इंग्रजी शाळेपेक्षा मराठी शाळेचा निकाल सरस
कर्मवीर विद्यालयाचा जयेश गायकवाड ९६.४० टक्के गुण घेऊन तालुक्यातून प्रथम
वरोरा
चेतन लूतडे
वरोरा शहरातील प्रतिष्ठित परिवारातील भाऊ आणि बहीण यांनी प्रथम क्रमांक पटकावल्याने तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे. यावेळी पिंटू गायकवाड यांनी भावनिक होऊन आपले मत व्यक्त केले आहे.
ते म्हणतात वडील म्हणून मी माझ्या मुलीवर माझ्या अपेक्षा लादल्या अस कधी कधी वाटायला लागते. तिच्या मैत्रीण शिकवणी लावत होत्या पण मी तिला म्हटले की तू लावू नकोस.
तिला समजावलं की तुझ्या लोकमान्य शाळेतील शिक्षकांवर विश्वास ठेव ते जे शिकवतील त्याच्या कड़े लक्ष्य दे
माझ्या कड़े शिकवनी लावायला पैसे नव्हते हा विषय नवता, पण काही गरीब पालक आपल्या मुलाना प्रत्येक विषयची शिकवनी लावू शकत नाही. त्यामुळे शाळेवर विश्वास ठेवून होतकरू व गरीब विद्यार्थी सुद्धा चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळू शकतो अशी अपेक्षा मी तिच्याकडून केली होती.
तिला म्हटले तुला शिकवनी न लावता चांगले मार्क मिळाले तर ज्यांच्याकडे पैसे नाहीत अशा गरीब विद्यार्थ्यांसाठी तू आदर्श ठरतील. त्यामुळे काही तरी पालक सुधरेल व आपल्या कष्टाचे पैसे शिकवनी वर घालवणार नाही.
6 व्या वर्गात किटू इंग्रजी माध्यमाच्या सेंटेंस शाळेत होती, तेव्हा मि तिला म्हटले की गरीब पालक पैसे नसताना सुद्धा शाळेत ऍडमिशन झाली पाहिजे असा प्रयत्न करीत असतात.
आज अजित दादा पवार यांची आ.प्रतिभा धानोरकर यांना भेट
मी एका मित्राला समजवल की खाजगी शाळेत न टाकता लोकमान्य मध्ये टाका तेव्हा त्याने मला विचारले की तुझी मुलगी खाजगी शाळेत आहे तर तुला बोलण्याचा अधिकार नाही.
किटू ला माझे दुःख समजल आणि तिने मला 7 व्या वर्गात लोकमान्य शाळेत टाकायचा आग्रह केला...
ती प्रत्येक वर्षी वर्गात प्रथम किंवा द्वितीय येत राहली.
वडिलांची ती गोष्ट खरी करण्यासाठी मराठी माध्यमातील समजली जाणारी उत्तम शाळेत अथक प्रयत्न सुरू ठेवले आणि त्याला आज यश आले. या सगळ्या घटनेत मी माझ्या मुलीवर माझे मत लादले असे कधी कधी वाटते.
परंतु समाधान आहे की शाळा कोणतीही असो हुशार विद्यार्थी कोणत्याही बिकट परिस्थितीत यश संपादन करू शकतो.
मग ती शाळा खाजगी असो की सरकारी.
कर्मवीर विद्यालयाचा जयेश गायकवाड ९६.४० टक्के गुण घेऊन तालुक्यातून प्रथम
माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या दहावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल आज शुक्रवार दि.२जून रोजी दुपारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. यात वरोरा येथील कर्मवीर विद्यालयाचा जयेश राजू गायकवाड याने ९६.४०% गुण घेत तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. तर लोकमान्य विद्यालयाचा प्रत्युष नरेश बुरडकर याने ९५.२०% गुण प्राप्त करून तालुक्यातून दुसऱ्या येण्याचा बहुमान मिळवला. लोकमान्य कन्या विद्यालयाची प्रांजली प्रवीण गायकवाड ९५ % गुण घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिली. हिरालाल लोया विद्यालयाची कीर्तीका प्रशांत सोनेकर हिने ९४.६०% गुण घेऊन तालुक्यातून चौथा क्रमांक प्राप्त केला. तर नेहमी निकालात अग्रेसर राहणारे सेंट ॲन्स हायस्कूल यावर्षी मात्र पिछाडीवर पडल्याचे दिसून आले. त्या विद्यालयाची प्रेक्षा पालटीवार ने ९४% गुण घेऊन शाळेतून प्रथम तर तालुक्यातून पाचवा येण्याचा बहुमान मिळवला आहे. लोकमान्य विद्यालयाची सई संजय पारखी हिला ९३% गुण मिळाले. तर लोकमान्यचीच लावण्या पोलशेट्टीवार तिने ९२.४०%% गुण घेऊन प्राविण्य श्रेणी प्राप्त केली आहे.
कृतिका सोनेकर
दहावी:- ९४.६० %
हिरालाल विद्यालय वरोरा,
या यशाचे श्रेय शाळेचे शिक्षक वृंद , तथा परिवारास दिले आहे.
परिवारातील भावंडांसोबत असलेला फोटो
शिकवणी वर्गाचा फरक हुशार विद्यार्थी वर पडत नाही मात्र शिक्षणात अडथळा निर्माण होत असल्यास अभ्यासात थोडे सहज पण निर्माण होते. इंग्रजी व मराठी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना फारसा फरक पडत नाही. हुशार विद्यार्थी विपरीत परिस्थितीत सुद्धा मेहनत करत राहतो.
Comments
Post a Comment