फक्त बातमी
चेतन लूतडे वरोरा
चंद्रपूर -वणी- आर्णी लोकसभा क्षेत्राचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली
अर्पण करण्यासाठी बुधवारी वरोरा येथील आंबेडकर चौकात सर्वपक्षीय सभा पार पडली. वरोऱ्यातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व व्यापारी संघटनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी माजी खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या आठवणीला उजाळा देत त्यांच्या आठवणी सभेमध्ये बोलून दाखवल्या. यावेळी धानोरकर शोकाकुल परिवारातील आमदार प्रतिभाताई धानोरकर यांना सांत्वना देत आप्तेष्ट मंडळीनी भेटी दिल्या.आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी जनतेला बाळूभाऊचे उर्वरित स्वप्न आपण नक्की पूर्ण करणार अशी ग्वाही देत श्रद्धांजली अर्पण केली. आणि विरोधकांना आपल्या शैलीत इशारा देत "मी पण बाळूभाऊ धानोरकर यांची पत्नी आहे."असे सूचक वक्तव्य करत येणाऱ्या संकटांना तोंड देण्याची हिंमत त्यांनी आपल्या भाषणात बोलून दाखवली.
या कार्यक्रमासाठी अखील भारतीय गुरूदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत पत्नी ,आमदार सौ.प्रतिभाताई धानोरकर, भाऊ भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर , पुत्र मानस धानोरकर , प्रवीण काकडे उपस्थित होते.
लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील, डॉ. राजेंद्र ढवस, शिवसेना(ठाकरे गट) जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जंयत टेंमूर्डे भारतीय जनता पक्षाचे बाबा भागडे,माजी जी.प. सभापती प्रकाश मुथा, विलास नेरकर, विलास टिपले, राजेंद्र चिकटे, योगेश डोंगरवार,मॉर्निंग वॉकग्रुपचे सचिव बंडू देऊळकर, गांधी उद्यान योग मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नेमाडे,
या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
या सभेसाठी वरोरा तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. सुचेता पद्मावार यांच्या श्रद्धांजलीपर गीत गायनाने परिसर भाऊक झाला होता.
Comments
Post a Comment