*किशोर टोंगे व शारदा फाउंडेशनचे आयोजन
वरोरा : येथील विविध विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस मधून दहावी, बारावी च्या परिक्षेसह इतर स्पर्धा परीक्षांमध्ये प्राविण्य प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार किशोर टोंगे मित्रपरिवार आणि शारदा फाउंडेशनच्या वतीने २ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे.
वरोरा शहर व परिसरात उत्तम शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्थांचे आणि कोचिंग क्लासेसचे जाळे पसरलेले आहे. यातुन दरवर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते. तसेच कोचिंग क्लासेस मधून देखील स्पर्धा परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते. अशा वर्ग दहावी, बारावी, नीट, जेइइ, एमएचसीइटी, पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी, यासह नवोदय विद्यालयाच्या प्रवेश पात्र स्पर्धा परीक्षेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी प्रेरणा मिळावी या हेतूने किशोर टोंगे मित्रपरिवार आणि शारदा फाउंडेशन च्या वतीने त्यांचा सत्कार करण्याचे आयोजित करण्यात आले आहे.
दि .२ जुलै रोजी स्थानिक नगर भवन मध्ये दुपारी २:३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार आणि विदर्भ जन आंदोलन समितीचे अध्यक्ष ॲड. वामनराव चटप राहणार असून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला असणार आहे. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महारोगी सेवा समिती आनंदवनचे सचिव डॉ. विकास आमटे, विधान परिषदेवरील शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी आणि जेष्ठ साहित्यिक ना.गो. थुटे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. सर्व निमंत्रकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन किशोर टोंगे आणि मित्रपरिवार यांनी केले आहे.
Comments
Post a Comment