श्रेयश निबूदेचं NEET परीक्षेतील यश जिल्ह्यासाठी अभिमानास्पद: किशोर टोंगे

श्रेयश निबूदेचं NEET परीक्षेतील यश जिल्ह्यासाठी अभिमानास्पद: किशोर टोंगे 


वरोरा:

सन 2023 मध्ये झालेल्या वैद्यकीय पात्रता प्रवेश परिक्षा NEET मध्ये भद्रावती तालुक्यातील सागरा येथील सेवा सहकारी सोसायटी चे अध्यक्ष युवराज निबूदे यांचे चिरंजीव श्रेयश याने एकूण 680 गुण प्राप्त करत चंद्रपूर जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावत नेत्रदीपक यश मिळवले आहे हे आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे.

यानिमित्ताने श्रेयशची भेट घेऊन त्याचे स्वागत आणि सत्कार केला. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन स्व प्रतिभेवर हे यश मिळवण खरंतर खूप कठीण असतं. देशापातळीवर होणाऱ्या या परीक्षेत मोठी स्पर्धा असते. शहरी भागात सर्व सुविधा आणि कोचिंग मार्गदर्शन असते मात्र आमच्या शेतकरी बांधवांच्या मुलांना या सुविधा अभावानेच मिळतात अशा इतर मुलांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.

यासाठी श्रेयश आणि त्यांचे आईवडील चंदा आणि युवराज निबूदे देखील कौतुकास पात्र आहेत. माझं इतर पालकांना देखील आवाहन आहे की आपल्या पाल्याला योग्य मार्गदर्शन करत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे आपण उभे राहिल्यास त्याला त्यांच्या क्षेत्रात यश नक्की मिळते.

आमच्या नातेवाईक मंडळीत देखील मी पहिला इंजिनियर झालो होतो आज आता श्रेयश पहिला डॉक्टर होणार आहे याचा मला निश्चितच आनंद आहे. कुटुंबातील एक व्यक्ती शिकली तर कुटुंबाचं भाग्य बदलत म्हणून योग्य आणि दर्जेदार शिक्षणाच्या संधी आपण मुलांना उपलब्ध करून दिल्या पाहिजे असंही किशोर टोंगे यावेळी म्हणाले.

Happy anniversary om bha

Comments