कामगाराचा आंदोलनाचा इशारा
वरोरा
चेतन लूतडे 15july2023
वरोरा तालुक्यातील मजरा येथील बीएस इस्पात कंपनी नेहमी वादग्रस्त ठरल्याचे चित्र दिसत आहे. कंपनीचे नवीन मालकानी जेव्हा पासून कंपनी टेक ओवर केली आहे. तेव्हापासून स्थायी रोजगार संबंधीचा वाद नेहमी उफाळत राहिला आहे. ही कंपनी स्पाज आयरन व विद्युत निर्मिती करण्याचे काम करीत आहे. या कामगारांनी कंपनीचे प्रोडक्शन सुरू केले होते.
या कंपनीमधील 2020 पासून कार्यरत कामगारांना कोणतीही कारण न सांगता कामावरून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे या युवकांनी कंपनी विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून न्याय मागण्यासाठी राजकीय पाठबळ मिळवीत आहे.
या कंपनीतील अकरा कामगार नियमित कामावर जात असताना . कामगार पुरवण्याचा ठेका फरीदाबाद येथील थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्टर लकी इंजीनियरिंग कंपनी यांना देण्यात आला होता. मात्र हा कॉन्ट्रॅक्ट संपून दोन महिने उलटले होते. यानंतर कामगाराची गरज असल्यामुळे कंपनीने दोन महिने या कामगाराकडून काम करून घेतले. मात्र यानंतर यांची गरज संपल्यामुळे तडकाफडकी कंपनीने या कामगारांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे नाराज झालेल्या कामगारांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केली.
यावेळी कामगारांसोबत बोलत असताना कामगारासाठी जिल्ह्यामध्ये कोणी वाली उरलेले नाही कामगारावर उपासमारीची वेळ आली असून प्लांट जर तोट्यात चालत असेल तर पूर्णतः बंद करावा अशी खंत कामगारांनी व्यक्त केली. कामगार आयुक्त सुद्धा मदत करीत नसून येणाऱ्या दिवसात कंपनी पुढे आंदोलन करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे.
मागील काही दिवसाचे पगार कंपनीकडे बाकी असून पीएफ आणि esic कंपनीने भरला नसल्याचाही दावा त्यांनी केला.
त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील कंपनीचे ऑडिट करून बेरोजगारांना रोजगार देण्याची मागणी युवकांनी प्रशासनाला केली आहे.
मॉर्निंग व ग्रुप श्रमदान शिबिर, वरोरा
Comments
Post a Comment