मंत्री सुधीरभाऊ मूनगंटीवार मित्र परिवारातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन.डॉक्टरांनी सुद्धा केले रक्तदान.
डॉक्टरांनी सुद्धा केले रक्तदान.
वरोरा
चेतन लूतडे
महाराष्ट्राचे लोकनेते मा.ना.श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री महारक्तदान यज्ञ शिबिराचे आयोजन वनी रोडवरील अली सेलिब्रेशन हॉल, वरोरा येथे करण्यात आले.
संपूर्ण जिल्ह्यात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले यावेळी जिल्हाभरातून पाच हजार रक्त पिशव्या गोळा होण्याची शक्यता आहे.
वरोरा शहरात याच उपक्रमाचा एक भाग म्हणून मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी रक्तदान करून साजरा केला. यावेळी शाळकरी विद्यार्थ्यांपासून तर वयोवृद्ध व्यक्तीं व महिलांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्यासाठी रांग लागली होती. यावेळी वंदे मातरम घोषणा देत कार्यकर्त्यांनी सुधीरभाऊ यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. यानिमित्ताने रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना भेटवस्तू व अल्पपोहाराची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
गव्हर्नमेंट हॉस्पिटल वर्धा, यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम वरोरा येथील अली सभागृहात आयोजित करण्यात आला . सुधीर भाऊ मित्र परिवारातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला. यावेळी 202 बॉटल रक्तदान शिबिरात करण्यात आले. यानिमित्ताने डॉक्टर सागर वझे यांनी रक्तदान करून समाजापुढे आदर्श निर्माण केला.
यावेळी शहरातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Comments
Post a Comment