स्वतःच्या विकासा सोबत समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध राहा* गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात किशोर टोंगे यांचे आवाहन

स्वतःच्या विकासा सोबत समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध राहा* 

गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात किशोर टोंगे यांचे आवाहन

वरोरा 

किशोर दादा टोंगे मित्रपरिवार आणि शारदा फाउंडेशनच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा नगर भवन वरोरा येथे उत्साहात पार पडला यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पालक आणि सुजान नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना किशोर टोंगे यांनी शिक्षण, रोजगार आणि आपल्या प्रदेशाचा विकास याबाबत आपली भूमिका मांडताना विद्यार्थ्यांना करियर आणि व्यवसायाविषयी मार्गदर्शन केलं. 

येणाऱ्या काळात निर्माण होणाऱ्या नवनवीन आव्हानांना कसं सामोर जायचं, यावर कशी मात करायची याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच आज घेतलेल्या शिक्षणाचा फायदा करून स्वतःच्या कौशल्याच्या जोरावर आपलं करिअर सेट करण्याचा मूलमंत्र त्यांनी दिला.

आपल्या नोकरी व व्यवसायात यश मिळाल्यानंतर आपल्या गावाचा, आपल्या परिसराचा विकास करण्यासाठी आपल्या कौशल्याचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रम कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार वामनराव चटप होते त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना या तरुण विद्यार्थ्यांनी विदर्भाचा विकासाचा अनुशेष भरून काढावा यासाठी प्रयत्न करावेत असेही ते म्हणाले पालकांना या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कुठलाही खंड पडू देऊ नये असा आवाहन त्यांनी केलं.

या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ साहित्यिक नागो थुटे सर उपस्थित होते गुणवंतांचा कौतुक सोहळा घडवून आणल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रम प्रसंगी देविदास कष्टी, पांडुरंग टोंगे, वैभव डहाणे, धनराज अस्वले, गोपाल वर्मा, ऋषी मडावी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Comments