शिवसेना (उबाठा) तर्फे खेमजई ग्राम वासियांना 200 वृक्ष भेट, मदतीचा सप्ताह उपक्रम : जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे यांचे नेतृत्व
मदतीचा सप्ताह उपक्रम : जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे यांचे नेतृत्व
वरोरा : शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांच्या नेतृत्वात "मदतीचा सप्ताह" उपक्रम ठिकठिकाणी राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून दि. ५ ऑगस्ट रोजी तालुक्यातील खेमजई येथे 200 वृक्ष भेट देण्यात आले.
शिवसेना (उबाठा) पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांच्या नेतृत्वात "मदतीचा सप्ताह" या उपक्रमा अंतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. तालुक्यातील खेमजई ग्रामवसियांतर्फे दरवर्षी वृक्षलागवडीचा संकल्प हाती घेतला जातो. यावर्षीसुद्धा 10 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प राबविण्यात येत आहे. यात आणखी भर घालत जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी वृक्ष लागवडीच्या संकल्पनेत भाग घेत. 200 सिताफळ वृक्ष ग्रामवासीयांना भेट देण्यात आली . गावातील मुख्य ठिकाणी वृक्ष लागवड करून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. खेमजई ग्राम वासियांतर्फे वृक्षलागवडीच्या संकल्पनात निधीची कमतरता भासल्यास शिवसेना ग्रामवसियांच्या पाठीची ठाम उभी राहील असे आश्वासन जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी याप्रसंगी दिले.
यावेळी शिवसेना (उबाठा) वरोरा - भद्रावती विधानसभा प्रमुख रितेश रहाटे, शेगांव (बु ) पोलीस स्टेशनचे ठाणेदार अविनाश मेश्राम , पशुवैद्यकीय अधिकारी अघडते युवासेना जिल्हा प्रमुख मनिष जेठानी, विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले, शिवदूत बंडु डाखरे, विधानसभा मिडीया प्रमुख गणेश चिडे, खेमजई येथील उपसरपंच चंद्रदास मोरे , सामाजिक कार्यकर्ते रमेश चौधरी , पोलीस पाटील विश्वनाथ तुराणकर तसेच ग्रामवासी उपस्थित होते.
Comments
Post a Comment