*मनसेचे तहसीलदारांना निवेदन
वरोरा : येथील तहसील कार्यालय परिसरात महिला व पुरुष वर्गासाठी स्वच्छता गृह बांधून देण्यात यावे अशी मागणी मनसे तर्फे करण्यात आली.
तहसीलयात दररोज हजारो महिला व पुरुष आपली कामे घेवून येतात. परंतु तहसील कार्यालयात शौचालयाची व्यवस्था नाही ही शोकांतिका आहे. येत्या आठ दिवसात तहसील कार्यालय वरोरा येथे महिला व पुरुष वर्गासाठी शौचालयाची त्वरित व्यवस्था करण्यात यावी अन्यथा मनसे आपल्या पद्धतीने आंदोलन करेल तसेच रत्नमाला चौक येथील उड्डाणपुलाला वीर बापूराव पुल्लेशूर शेडमाके हे नाव गेल्या अनेक वर्षापासून घोषित आहे तरी त्या प्रवेशद्वाराला वीर बापूराव पूल्लेशूर शेडमाके हे नाव देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सादर केले.तसेच चौकातील दिशादर्शक फलक हे फक्त दिशादर्शकच रहावे या फलकावर कोणत्याही पक्षाचे बॅनर लागू नये याकरिता सुद्धा निवेदन देण्यात आले.यावेळी
मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत जुंजारे, आनंद गेडाम, आकाश काकडे, कपिल कन्नाके, दशरथ आत्राम, विकास वरखडे,रोशन कन्नाके, मंथन कोडापे, सुमित मडावी, विशेष आत्राम, कपिल कन्नाके, शुभम मेश्राम, प्रेम मेश्राम, ओंकार मेश्राम, सिद्धांत सालोरकर, विनीत येरमे इत्यादी मनसैनिक उपस्थित होते
Comments
Post a Comment