वरोरा जिल्हानिर्मिती होण्याकरिता शासनाला प्रस्ताव पाठवा**आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची जिल्हाधिकारी विनय गौंडा यांच्या दालनात बैठक*
*आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची जिल्हाधिकारी विनय गौंडा यांच्या दालनात बैठक*
Warora : राज्याच्या लोकसंख्येप्रमाणे सुमारे नवीन २२ जिल्ह्यांची निर्मिती करण्याच्या हालचाली सुरु आहेत. चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्हा निर्मिती करतांना वरोरा हे ठिकाण सर्वच दृष्टीने उपयुक्त आहे. प्रस्तावित जिल्हानिर्मिती दरम्यान निर्णय घेतांना घिसाडघाई न करता त्यांत समाविष्ट होणाऱ्या तालुक्यातील जनतेची मते जाणूनच निर्णय घेतला पाहिजे. भौगिलिक व इतर सर्वच बाबतीत वरोरा योग्य असून त्यादृष्टीने वरोरा जिल्हानिर्मिती करण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्याची विनंती आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी जिल्हाधिकारी विनय गौंडा यांना केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील २० कलमी सभागृहात वरोरा संघर्ष समितीचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांच्या सोबत अनेक विषयांवर बैठक घेण्यात आली.
यावेळी वरोरा शहरातील कासमपंजा नाल्यातील पाणी वेकोलिच्या नवीन प्रस्तावित रोडमुळे निघण्यास अडथळा होत असल्याने पर्यायी व्यवस्था करणे, नगर शहराच्या मध्यभागी असलेल्या गांधी तलाव नगर परिषदेला हस्तांतरित करणे, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजने अंतर्गत वरोरा पाणी पुरवठा योजनेस एम. आय. डी. सी. (म. औ, वि, म) कडून पाणी आरक्षण मिळण्याकरिता नाहरकत प्रमाणपत्र त्वरित मिळावे. याकरिता स्वतः लक्ष देऊन त्वरित या मागण्या मान्य करण्याची विनंती आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली.
याप्रसंगी वरोरा उपविभागीय अधिकारी,कार्यकारी अभियंता, एम.आय.डी.सी.चंद्रपूर, अधिक्षक अभियांता पाटबंधार विभाग चंद्रपूर, कार्यकारी अभियता पाटबंधार विभाग चंद्रपूर, वरोरा तहसिलदार, मुख्याधिकारी वरोरा, कार्यकारी अभियंता, एम.जे.पी चंद्रपूर, क्षेत्रीय व्यवस्थापक, वेकोली, वणी, एरीया तसेच वरोरा जिल्हा संघर्ष समितीचे पदाधिकारी प्रवीण सुराणा, डॉ. सागर वझे, प्रवीण धनवलकर, विलास नेरकर, प्रमोद काळे, मनीष जेठानी, सारथी ठाकूर यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment