दिल्ली येथील सोहळ्यात होणार सहभागी
वरोरा : 15 ऑगस्ट
शारदा फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून वरोरा तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक, व सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारा चंद्रपूर येथील स्व. सुशीलबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली कॉलेजचा माजी विद्यार्थी तथा आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन वरोरा येथे समाजशास्त्र या विषयात एम.ए. प्रथम वर्षात शिक्षण घेणारा परसोडा येथील युवा कार्यकर्ता शुभम शिवशंकर आमने यांची स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त ‘मेरी माटी मेरा देश’ या केंद्र सरकारच्या उपक्रमात प्रत्येक गावात विरांना वंदन करणार स्मारक तयार करून त्या गावाची माती तालुक्याच्या ठिकाणी गोळा करण्यात येत असून वरोरा तालुक्यातील सर्व ८१ ग्रामपंचायत मधून गोळा करण्यात आलेल्या मातीचा मंगल कलश दिल्ली येथे विरांच्या स्मरणार्थ तयार करण्यात येत असलेल्या वाटीकेसाठी वापरण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थिती मध्ये होत असून या कार्यक्रमात तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शुभम आमने यांची निवड करण्यात आली असून त्याचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.
यावेळी शुभम आमने याने या निवडीबद्दल जिल्हा प्रशासन, वरोरा उपभाविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच शारदा फाउंडेशचे निकेश आमने-पाटील, किशोर टोंगे तसेच इतर मार्गदर्शकांचे आभार मानले व या सर्वांच्या सहकार्यामुळे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिल्लीला सहभागी होण्याची ही संधी मिळाली असून ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे अशी भावना व्यक्त केली.
Comments
Post a Comment