अवैधरीत्या जनावराची वाहतूक करणाऱ्या इसमांना अटक

अवैधरीत्या जनावराची वाहतूक करणाऱ्या इसमांना अटक

वरोरा 18 ऑगस्ट23 :- वरोरा तालुक्यातील शेगाव बू. पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध जनावराची वाहतूक करणाऱ्या काही इसमान्ना अटक करण्यात आली .
शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनात काल रात्री गुरुवारी चार चाकी बोलेरो वाहनाची झडती घेतली असता त्यात कत्तली साठी जात असणाऱ्या 26 जनावराला ताब्यात घेऊन पाच आरोपी ला अटक करण्यात आली. यानंतर यास जनावरांना घनश्याम लीला गोरक्षण कडे सुपूर्त करण्यात आले.

अब्दुल नाजिम अब्दुल कुरेशी वय 28वर्ष राह. कॅलरी वार्ड वरोरा.बिलाल जाकिर कुरेशी वय 18 वर्ष डोलारा तलाव भद्रावती , रीतिक सावंत मेश्राम वय 23 वर्ष रा. एकर्जूना वरोरा , राजेंद्र भाऊराव सोयांम वय 55 वर्ष राह. कॉलारी वार्ड वरोरा. नेहाल राजेंद्र सोयाम वरोरा या पाचही आरोपीला अटक करण्यात आले. या घटनेत 9 लाख 59 हजार रुपयाचा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे. सदर ही कारवाई येथील ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनात श्री देवा डुकरे यांनी केली.

Comments