वरोरातील जुगार खेळणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांची कारवाई. प्लेईगकार्ड मध्ये हात चलाकी करणारी टोळी सक्रिय.
वरोरातील जुगार खेळणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांची कारवाई.
प्लेइंगकार्ड मध्ये हात चलाकी करणारी टोळी सक्रिय.
वरोरा
चेतन लूतडे
वरोरा येथील एका घरात पोलिसांनी धाड टाकून काही युवकांना पकडण्यात आले आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी व त्यांच्या टीम मुळे अवैध धंदे करणाऱ्या टोळीमध्ये वरोरा शहरात चांगलीच खळबळ उडाली असून अवैध गुन्हे करणाऱ्या इसमांना चांगलाच चोप देत आहेत.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वरोरा येथील एका घरामध्ये काही युवक जुगारावर पैसे खेळत असल्याची खबर मिळताच या घरावर धाड टाकली असता. यादरम्यान पोलिसांना 52 पत्त्याचे कार्ड व रोख रक्कम घटनास्थळी आढळून आल्याचे कळले. जुगार अॅक्ट नुसार या युवकांवर कारवाई करण्यात आली असून पुढील तपासासाठी वरोरा पोलिस कारवाई करत आहे.
ही कारवाई अंदाजे पाच वाजताच्या दरम्यान झाली असून अजून पर्यंत आरोपींची नावे कळली नाहीत.
मात्र पोलीस सखोल तपास करीत असल्याचे कळविण्यात येत आहे.
पोळा हा सण जवळच आला असून या सणांमध्ये मोठ्या प्रमाणात गावा गावामध्ये जुगार खेळण्याची प्रथा आहे. मात्र कायद्याच्या दृष्टिकोनातून जुगारावर पैसे खेळणे गुन्हा असून पोलीस याकडे बारीक लक्ष ठेवून असतात.
जुगार खेळत असल्यास ही बातमी वाचा
जुगारामध्ये हात चालाकी केली जाते. यामध्ये 52 कार्डवर डोळ्यांनी न दिसणाऱ्या रेषा ओढल्या जातात किंवा ठराविक ओळख केली जाते. असे कार्ड मित्रा तर्फे किंवा नाल(पैसे काढणाऱ्या) काढणाऱ्या व्यक्तीकडून ग्रुपमध्ये टाकल्या जाते. जेणेकरून चालाकी करणाऱ्या व्यक्तीवर संशय गेला नाही पाहिजे. यानंतर ग्रुपमध्ये मिसळून असलेले दोन मित्र हात चलाकी करणाऱ्या मित्राला सांभाळून घेतात.
व नंतर असली खेळ चालू होतो.
आपल्याच मित्राला जुगारामध्ये बसवून कसे हरवल्या जाते. हे पहात मित्र हसत असतात.
त्यामुळे मित्रांपासून जुगारामध्ये सावध राहण्याची गरज आहे. किंवा अशा आमिषाला बळी पडू नये.
दुसरा फंडा
Cvk 680, आय लेंस, किंवा अद्यावत ऎपलिकेशन एखाद्या मोबाईल मध्ये साठवून ठेवल्या जाते. यानंतर कानात मक्खी म्हणजे हेडफोन लावून हा चालाख व्यक्ती तुमच्यासोबत पैसे जूगारात खेळत असतो. कुणाकडे पैसे जाणार आहे हे त्याला त्याच्या कानामध्ये लगेच माहीत होत असते. किंवा घड्याळ्यात आणि त्या पद्धतीने तो जुगारावर पैसे लावत असतो आणि जिंकत असतो. या संबंधात यूट्यूब वर तुम्ही माहिती बघू शकता.
त्यामुळे युवकांनी जुगार खेळू नये . यामध्ये फक्त हात चलाकी करणारे लोकच जिंकत असतात हे अजूनही युवकांना कळालेले नाही.
असे बरेच उदाहरण वरोरा शहरात व देशात बघायला मिळतील.
जाहिरात
Comments
Post a Comment