सहाय्यक निबंध कार्यालया वर खातेदारांचे भीक मागून आंदोलन * री ऑडिट करण्याची मागणी* तेजस्विनी पतसंस्थेच्या ठेवीदारांचे अनोखे आंदोलन.

सहाय्यक निबंध कार्यालया वर खातेदारांचे भीक मागून आंदोलन

री ऑडिट करण्याची मागणी

तेजस्विनी पतसंस्थेच्या ठेवीदारांचे अनोखे आंदोलन.

वरोरा
चेतन लूतडे 

वरोरा येथील तेजस्विनी नागरी  सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांनी सहाय्यक निबंधक कार्यालयात मोर्चा नेत भिक मांगो आंदोलन करत साहेब हे पैशे घ्या पण आम्हाला न्याय द्या अशी भूमिका घेतल्याने अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.
जाहिरात 

वरोरा येथे 2014 साली तेजस्विनी नागरी सहकारी पतसंस्था उघडण्यात आली होती .तालुक्यातील अनेक किरकोळ व्यापारी, शेतकरी ,शेतमजूर तसेच अनेक ठेवीदारांनी दैनिक ठेव तसेच आवर्त ठेव स्वरूपात पतसंस्थेत  पैसे जमा केले. मात्र कर्जाची वसुली न झाल्याने पतसंस्था डबकळीस आल्याचे कारणावरुन प्रशासक नेमण्यात आले. ठेवीदारांची ठेव रक्कम वापस न मिळाल्याने खातेदारांनी बँकेच्या एजंट यांनी याविरुद्ध आवाज उठवला आहे.

 पतसंस्थेचे अध्यक्ष तथा संचालकांना एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याने ठेवीदारांना धमकावून पैसे परत देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप पतसंस्थेच्या अभीकर्त्या  नलिनी जोगे व रोहिणी पाटील यांनी केला आहे.  गेल्या 8 वर्षापासून येथील ठेवीदार कार्यालयात उंबरठे  झिजवून सुद्धा न्याय मिळत नसल्याने येथील ठेवीदारांनी आक्रमक रूप घेत  सहाय्यक निबंधक कार्यालयात भिकमांगो आंदोलन करत आपली व्यथा मांडली. तसेच तक्रार करत साहेब हे पैसे घ्या पण आम्हाला न्याय द्या अशी आर्त हाक दिली. त्यामुळे या महिलांना न्याय मिळेल की राजकीय दबावाखाली प्रकरण दडपण्याचा येईल हे बघने  आता औचित्याचे ठरणार आहे.

प्रशासक, येवले
पतसंस्थेच्या या व्यवहारामुळे प्रशासकाची नेमणूक झाली असून यासंदर्भातील ऑडिट पूर्ण झाले आहे. सहाय्यक निबंधक कार्यालयात माझी नेमणूक येत्या दहा महिन्यापासून झाली असून या प्रकरणातील री ऑडिटिंग करून गैरव्यवहार झाला असल्यास तो नक्की उघडकीस आणल्या जाईल अशी ग्वाही प्रशासक येवले यांनी खातेदारांना दिली. दुय्यम निबंधक कार्यालयातील मॅडम संन्धू यांना जास्तीचा भार असल्यामुळे ते अनुपस्थित होत्या.

तेजस्विनी नागरी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष नर्मदा ताई पेंदोर (बोरकर)

खातेदारांनी मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेतल्याने व कर्ज स्वरूपात खातेदारांनी पैसे वापस न दिल्याने पतसंस्थेची वाटचाल प्रशासकाकडे द्यावी लागली. यानंतर नवीन संचालक मंडळ निवडण्यासाठी निवडणुका सुद्धा जाहीर करण्यात आल्या नाही. त्यामुळे खातेदारांचे पैसे वापस देण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या. आता प्रशासक असल्याने हा सर्व निर्णय प्रशासक घेतील. किंवा ज्या खातेदारांना पैसे वापस घेण्यासाठी सहाय्यक निबंधक कार्यालयातील संस्थेचे प्रशासक यांच्याकडे लेखी स्वरूपात मागणी करता येईल असे मत व्यक्त केले. 

पण या सगळ्या बाबीचा परिणाम म्हणून खातेदारांनी पतसंस्थेचे सदस्य व कृषी उत्पन्न बाजार समितीचे बांधकाम सभापती दत्ता बोरेकर यांना कृषी उत्पन्न बाजार समिती च्या कार्यालयात जाऊन विचारणा करण्याची मागणी तिथे बसून असलेल्या सभापतींना केली होती मात्र यावेळी अनर्थ टाळावा यासाठी सभापतींनी या सर्व खातेदारांना कार्यालयाच्या बाहेर जाण्यास सांगितले. खातेदारांचे पैसे वापस मिळत नसल्याने दोन एजंट आणि काही खातेदार आक्रमक झाले होते.


Comments