वरोडा शहरात सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश**दोन एजंट सह नऊ आरोपींना अटक*

*वरोडा शहरात सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश*
*दोन एजंट सह नऊ आरोपींना अटक*

वरोडा :  श्याम ठेंगडी

       एका अल्पवयीन गरीब मुलीला पैशाचे आमीष दाखवून दोन एजंटनी तिला देहव्यापार करण्यास भाग पाडले. या प्रकरणात वरोडा पोलिसांनी 11 जणांना अटक केली असल्याची माहिती येथील उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांनी आज दुपारी येथील पोलीस स्टेशन मध्ये घेतलेल्या पत्र परिषदेत दिली 
           त्यांनी दिलेल्या माहितीनुसार,काल ३ ऑगस्ट रोज शुक्रवारला एका बेपत्ता प्रकरणाचा तपास करीत असतांना उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी  यांना या प्रकरणाची माहिती मिळाली. 
     ही धक्कादायक माहिती मिळताच त्यांनी त्या दिशेने चौकशीला प्रारंभ केला असता एका अल्पवयीन गरीब मुलीकडून शहरातील एक २२ वर्षीय महिला व पुरूष असे दोन एजंट देहव्यापा करून घेत असल्याचे समजले. अधिक चौकशी केली असता यात या दोन एजंट सह नऊ जण आरोपी असल्याचे दिसून आले. ही घटना काल तीन ऑगस्ट रोज शुक्रवारी उघडकीस आली. पोलिसांनी याप्रकरणी 11 जणांना अटक केली असून यातील एक आरोपी अगोदरच एका गुन्ह्यात अटकेत आहे.  उर्वरित दहा जणांत या दोन एजंट चा समावेश आहे .
         या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या नेतृत्वात एक एसआयटी स्थापन केली असून यात दोन महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
         या प्रकरणातील अल्पवयीन मुलीवर वरोडा व भद्रावती शहरात अनेकांनी आपली वासना शमवून घेतल्याचे समोर येत असल्यानै अटक करण्यात आलेल्या 11 जणांमसह ही संख्या वाढण्याची शक्यता उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांनी व्यक्त केली.यात तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे ही समोर आले असून  तिला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार करत असल्याचा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे .या व्हिडिओचा धाक दाखवून  त्याच्यावर अतिप्रसंग केल्याचे सांगितले .
        हे प्रकरण दोन ते तीन महिन्यापासून चालू असल्याने यातील आरोपींची संख्या वाढण्याचा अंदाज  असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रकरणी पोलिसांनी भादवीच्या विविध कलमाने गुन्हा नोंदविला आहे.


Comments