कांदा अनुदान मिळालेल्या शेतकऱ्यांची गोठवलेली खाते त्वरित सुरू करा* रमेश राजूरकर यांची मागणी* राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता
* रमेश राजूरकर यांची मागणी
* राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता
वरोरा
अनिल पाटील ,वरोरा
वरोरा : कांदा अनुदान वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप करून चौकशीची मागणी आमदार प्रतिभा धानोरकर व त्यांचे पदाधिकारी असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजू चिकटे तसेच शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आणि संचालक नितीन मत्ते यानी केली होती. त्यानंतर अनुदान प्राप्त शेतकऱ्यांची बँक खाती चौकशी होत पर्यंत गोठवली गेली आहे. यामुळे संतप्त झालेल्या भाजपचे विधानसभा प्रचार प्रमुख रमेश राजूरकर यांनी बँक खाते त्वरित सुरू करा अशी मागणी करून कुणाचेही नावे न घेता तक्रार कर्त्याना शेतकऱ्यांचे आंदोलन उभे करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
भद्रावती- वरोरा विधानसभा क्षेत्रामधील ६७० गावांमध्ये सन २०२२-२४ हंगामात शेतकऱ्यांनी कांदा उत्पादन घेतले असून शासनाने जाहीर केलेले कांदा अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले पण काही स्थानिक नेत्यांच्या व त्यांचे सहकारी यांच्या राजकारणामुळे या अनुदान वाटपावर शासनामार्फत चौकशीचे आदेश आले व त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरील अनुदान ची रक्कम गोठविण्यात आली आहे.
या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरील अनुदानाची रक्कम गोठविण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक व्यवहार करण्याकरिता अडचणी निर्माण होत आहे. या शेतीच्या हंगामामध्ये सर्व शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे आणि वारंवार या शासकीय चौकशीमुळे मानसिक त्रास शेतकऱ्यांचा वाढला आहे. आर्थिक व मानसिक त्रासामुळे विदर्भातील असंख्य शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. जर या माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये शेतकऱ्याची आत्महत्या झाली तर जबाबदार कोण ? असा प्रश्न भाजपाचे विधानसभा प्रचार प्रमुख रमेश राजुरकर यांनी केला आहे .परिणामी सदर कारणास्तव पुन्हा आत्महत्या होऊ नये यासाठी शासनाने वेळीस उपाययोजना करून कांदा अनुदान मिळालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरील गोठविण्यात आलेली अनुदान ची रक्कम तातडीने शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी रमेश राजूरकर यांनी सरकारला केली आहे.
या प्रकरणांमध्ये स्थानिक राजकिय नेत्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या राजकारणासाठी शेतकऱ्यांचा वापर करू नये अन्यथा आम्ही स्वस्थ बसणार नाही व आंदोलन उभारू असा इशारा नाव न घेता त्यांनी आमदार प्रतिभा धानोरकर आणि बाजार समितीमधील विरोधी गटाच्या राजू चिकटे,नितिन मत्ते या संचालकांना दिला आहे. कारण त्यांनीच या प्रकरणात तक्रार करून चौकशीची मागणी केली होती हे विशेष. कांदा अनुदान वाटप पाटपावरून सुरू झालेले आरोप-प्रत्यारोप, तक्रार आणि त्यानंतर दिलेला हा इशारा यावरून राजकीय संघर्ष शिगेला पोहचण्याची चिन्हे दिसू लागली आहे.
Comments
Post a Comment