वरोऱ्यातिल शासकीय तांदूळ तस्करी प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करा *आमदार प्रतिभा धानोरकर यांची मागणी * राज्याच्याअन्न व नागरी पुरवठा सचिवांकडे मागणी

वरोऱ्यातिल शासकीय तांदूळ तस्करी प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करा 
*आमदार प्रतिभा धानोरकर यांची मागणी 
* राज्याच्याअन्न व नागरी पुरवठा सचिवांकडे मागणी

अनिल पाटील वरोरा 
वरोरा : परराज्यात तस्करी होत असलेल्या आणि तालुक्यातील शेगाव (बु) पोलिसांनी उघडकीस आणलेल्या शासकीय तांदूळ तस्कर प्रकरणात मोठे रॅकेट कार्यरत असून त्याचा पर्दाफाश होण्यासाठी एसआयटीचे गठन करून चौकशी करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा सचिव, मंत्रालय मुंबई यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
वरोरा तालुक्यातील शेगाव (बु) पोलिसांनी १७ ऑगस्ट २०२३ रोजी रात्रीच्या सुमारास परराज्यात निघालेल्या शासकीय तांदळाचे वाहन पकडले. त्यात ३१ टन तांदूळ आढळून आला. ठाणेदारांनी अन्न व नागरी पुरवठा निरीक्षक वरोरा यांना पत्र देऊन या संदर्भात त्यांचा अहवाल मागितला. यावर पुरवठा अधिकाऱ्यांनी तो तांदूळ शासकीय असू शकतो असा अहवाल दिला आणि त्यानुसार संबंधित व्यापारी, ट्रक मालक आणि चालक अशा तिघांवर जीवनावश्यक वस्तू कायदा ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल झाला. 

ट्रकचालक आणि मालक यांना पोलिसांनी अटक झाली. परंतु मुख्य आरोपी राहुल देवतळे मात्र पोलिसांच्या हाती लागला नाही आणि त्यांनी न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला.
 पोलिसांनी जो तांदूळ जप्त केला त्याचे माढेळी परिसरात नव्हे तर महारष्टात उत्पादन होत नाही. शेगाव पोलिसांना चौकशी दरम्यान बाजार समितीकडून काटा पट्टी मिळाल्या त्यावर ज्या शेतकऱ्यांची नावे आहेत ते शेतकरी धान उत्पादक नाही. त्यातील बहुतांश नावे ही बोगस शेतकऱ्यांची आहे. या प्रकारे शासनाकडून गोरगरीब जनतेसाठी मिळणारा तांदूळ त्यांच्यापर्यंत न पोहोचता तो अशा प्रकारे तस्करी केला जात असून त्याला चांगल्या तांदळात रूपांतरित करून व सुगंधित द्रव्य मारून पुन्हा खुल्या बाजारात आणल्या जात असल्याचे प्रतिभा धानोरकर यांनी निवेदनात म्हटले आहे. असा तांदूळ हा आरोग्यास हानिकारक असल्याने नागरिकांच्या जीविकास देखील धोका असल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. तांदूळ तस्करीचा हा गोरखधंदा चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फोपावला आहे. आणि यातून करोडो रूपयांचे गैरव्यवहार सुरू आहे. याला आळा घालण्यासाठी तसेच या मागचे पूर्ण रॅकेट बाहेर येण्यासाठी सदर प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा सचिव मंत्रालय मुंबई यांच्याकडे निवेदनातून केली आहे.


.   कांदा प्रकरणात चौकशीचे आदेश देणार.


बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी दिला होता वाहतूक परवाना
उपबाजार समिती माढेळीच्या मार्केट यार्ड मध्ये गोदाऊन किरायाने घेऊन राहुल देवतळे हा शासकीय तांदूळ तस्करीचा गोरख धंदा करीत होता. त्याने तांदळाची खरेदी दाखवून काटापट्टीत दर्शवलेली नावे पकडलेला तांदूळ उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची नसल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे सदर प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी त्या तांदूळ वाहतुकीचा परवाना देखील दिल्याचे समोर आले असल्याने यात त्या अधिकाऱ्यांचा तर सहभाग नाही ना अशीही शंका निर्माण होत आहे.


मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती न लागल्यानेच तथ्य गुलदस्त्यात

शासकीय तांदूळ तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल देवतळे याचेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. आणि तो पोलिसांच्या हाती लागला नाही. यादरम्यान त्याने वरोरा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. आणि त्याला अटकपूर्व जामीन मिळाला. अटकपूर्व जामीन मिळेपर्यंत मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती न लागल्यानेच या प्रकरणातील खरे तथ्य अजूनही गुलदस्त्यात आहे. या रॅकेटमध्ये मोठ-मोठे व्यापारी समाविष्ट असल्याची चर्चा परिसरात आहे. परिणामी याची सखोल चौकशी होणे गरजेचे झाले आहे.

तांदूळ प्रकरणात मुख्य आरोपांना नक्की कडक कारवाई होईल. या प्रकरणात मुख्यमंत्र्याकडे तक्रार दाखल केली आहे.

इतर जिल्ह्यातूनही जमा केला जात होता तांदूळ

शासकीय तांदळाच्या तस्करीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर याबाबत दररोज नवीन माहिती पुढे येत आहे. पकडल्या गेलेला तांदूळ हा शासकीय योजनेतील असल्याचे स्पष्ट झाले आहे . आणि तो तांदूळ चंद्रपूर जिल्ह्यासह यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्याच्या विविध भागातून सुद्धा माढेळी मध्ये विक्रीसाठी येत होता अशीही माहिती आहे. राहुल देवतळे यांनी गोदाम मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले होते. त्याची सायबर  सेल मार्फत चौकशी झाल्यास कोणत्या वाहनांनी तांदूळ गोदाम मध्ये आला आणि कोणत्या वाहनांनी व किती प्रमाणात तो बाहेर गेला हे समोर येऊ शकेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Comments