कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा येथील कांदा अनुदान रक्कम अपहार प्रकरणी द्विसदस्यीय कमिटीचा अहवाल त्वरीत

कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा येथील कांदा अनुदान रक्कम अपहार प्रकरणी द्विसदस्यीय कमिटीचा अहवाल 
दोशींवर लवकरात लवकर कारवाई करावी.
आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची मागणी.

वरोरा
चेतन लूतडे वरोरा 

 कांदा घोटाळयासंदर्भात जी आपण द्विसदस्यीय कमिटी नेमली त्याची चौकशी त्वरीत करण्यात यावी. या संदर्भातील पत्र संबंधित विभागाला आमदारांनी दिले आहे.

 शेतक-यांच्या खात्यातील अनुदान कोणत्याही परीस्थिती मध्ये व्यापारी किंवा त्यांच्या ऐजटला शेतक-यांनी परत देवु नये. अशा सुचना आपल्या स्तरावरून देवुन बँक आणि शेतक-यां पर्यंत कळविण्यात याव्या अशी सूचना करण्यात आली आहे.
 शेतक-यांची जी खाती गोठवली आहे ती पुर्ववत सुरू करावी ।

वर नमुद केलेल्या सर्व बाबींचा विचार करून वरोरा बाजार समितीचे सचिव व संबंधीत व्यापारी यांची सखोल चौकशी करून संबंधीत कांदा अनुदान प्रकरणी द्विसदस्यीय कमिटीचा अहवाल त्वरीत सादर करून दोषींवर कारवाई करण्यात यावी.
या संदर्भातील पत्र आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी जिल्हा निबंधक सहकारी संस्था कार्यालयाला दिलेले आहे.



Comments