वरोरा १८/९/२४: ७:३१
चेतन लूतडे
वरोरा येथे सोमवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात येणाऱ्या गणेश उत्सव आणि ईद-ए-मिलाद या सणासाठी वरोरा शहरात शांतता कमिटीची बैठक पार पडली.
सिद्धिविनायक भवन येथे सोमवारी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांच्यासह उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे , उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी , योगेश कौटकर तहसीलदार , पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यादरम्यान वरोरा शहरातील गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष तसेच शांतता कमिटीचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी वरोरा शहरातील ईद-ए-मिलाद २८ तारखेला तर गणेश विसर्जन 30 तारखेला करण्याचे ठरले आहे. यावेळी उपस्थित शांतता कमिटीच्या सदस्याकडून काही सूचना पोलीस विभागांना करण्यात आल्या होत्या. या सूचना पोलीस विभागाने नोंदवल्या असून या सूचनावर पोलीस अधीक्षक परदेशी बोलताना म्हणाले.
गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण एकत्र आले असून जनतेने कोणताही कायदा हाती न घेता उत्साह साजरा करावा. तालुक्यातील प्रत्येक मंडळाने पाच स्वयंसेवक रात्री सेवा देण्यासाठी मंडळात नेमून घ्यावे व तशी यादी पोलिसांना द्यावी. मंडळात कोणीही दारू पिऊन येऊ नये आल्यास तशी सूचना पोलिसांना द्यावी. मंडळामध्ये मूर्तीवर पाणी पडणार नाही याची दक्षता घ्यावी. तरुणाईत जोश भरपूर असतो परंतु त्याला थोडा ब्रेक सुद्धा असण्याची गरज असणे आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार असून कोणताही अनुचित प्रकार झाल्यास जनतेने पोलिसांना कळवावे अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
यावेळी शांतता कमिटीचे सदस्य पोलिसांना सहकार्य करतील
यासाठी माझी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, छोटू भाऊ शेख, जयंत टेंमूर्डे, रमेश राजुरकर, मुकेश जिवतोडे, डॉक्टर सागर वझे, आसिफ रजा, विलास नेरकर, योगेश डोंगरवार, नितेश जयस्वाल,पत्रकार, वरोरा शहरातील गणपती मंडळाचे अध्यक्ष व सदस्य शांतता कमिटीच्या बैठकीत उपस्थित होते.
Comments
Post a Comment