संजय गांधी योजनेतील लाभार्थी चार महिन्यापासून अनुदाना विनाश .शेकडो लाभार्थी तहसील कार्यालयावर धडकले.

संजय गांधी योजनेतील लाभार्थी चार महिन्यापासून अनुदाना विना

शेकडो लाभार्थी तहसील कार्यालयावर धडकले.

वरोरा
चेतन लूतडे 


वरोरा संजय गांधी निराधार योजनेचा लाभ तालुक्यातील  लाभार्थ्यांना मागील चार महिन्यापासून अनुदान मिळाले नसल्याने येणारी सण कसे जाईल अशी चिंता लाभार्थ्यांना पडली आहे. यासाठी तालुक्यातील शेकडो लाभार्थी तहसील कार्यालयावर धडकले.


संजय गांधी निराधार योजनेत गोरगरीब कुटुंबातील लाभार्थी आहे सदर योजनेत केंद्र शासन व राज्य शासन अनुदान देत असते मागील जून महिन्यापासून आज पावतो लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नसल्याने लाभार्थ्यांची अवस्था मोठी बिकट झाली आहे. अनुदान केव्हा मिळेल याकरिता लाभार्थी तहसील कार्यालयाचे उंबरटे झीजवीत आहे परंतु त्यांना समर्पक उत्तर मिळत नाही. ग्रामीण भागातून वरोरा शहरात येऊन अनुदानाबाबत विचारणा करण्याकरिता येणाऱ्या प्रवासाचा खर्चही सोसावा लागत आहे. या लाभार्थ्यांची दिवाळी अंधारात जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. थकीत अनुदान द्यावे व अनुदान दर महिन्याला वेळेवर देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.

लोकमान्य विद्यालयात पार पडला दीक्षांत समारंभ.

तहसील कार्यालयातील अशा योजनेच्या चौकशी संबंधित 11ते5 या वेळे पूरता दूरध्वनी क्रमांक जाहीर करावा. जेणेकरून लाभार्थ्यांना त्यांची माहिती घरबसल्या मिळू शकेल. निराधार व्यक्तींना तालुक्याच्या ठिकाणी येण्यास मोठी गैरसोय निर्माण होते. त्यामुळे शासनाने याबाबतीत लक्ष देऊन थकीत अनुदान लवकरात लवकर देण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी  सरकारकडे केली आहे.


 यावेळी वरोरा येथील तहसीलदार योगेश कौटकर यांना बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक राजेंद्र चिकटे, काँग्रेस तालुकाध्यक्ष मिलिंद भोयर पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र धोपटे व लाभार्थ्यांनी निवेदन दिले.


Comments