बँक अधिकारी असल्याचा बनाव करून महिलेला लुटणाऱ्या आरोपींना अटक ,चंद्रपूर गुन्हे शाखेची यशस्वी कामगिरी

बँक अधिकारी असल्याचा बनाव करून महिलेला लुटणाऱ्या आरोपींना अटक 

चंद्रपूर गुन्हे शाखेची यशस्वी कामगिरी

वरोरा:  तालुक्यातील येंसा गावातील महिलेची स्वतःला बँकेचे अधिकारी सांगुन पंतप्रधान किसान योजनेमार्फत पैसे मंजूर झाले असल्याची बतावनी करीत सोमवार दिनांक ९ ऑक्टोबर रोजी सकाळच्या  तब्बल ३८ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली . याबाबत महिलेने फिर्याद देताच चंद्रपुर गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवून दोन्ही आरोपीला २४ तासाच्या आत अटक करण्यात यश  मिळविले.
 वरोरा तालुक्यातील  येंसा येथील मंजुळाबाई नथुजी झाडे ६५ वर्ष या महिलेला दोन अज्ञात  इसमांनी स्वतःला बँकेचे अधिकारी असल्याचा बनाव करून पंतप्रधान किसान योजनेमार्फत १ लाख ४० हजार व बैलबंडी साठी ३ लाख रुपये मंजूर झाले असल्याचे सांगितले. परंतु त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधी २२ हजार रुपये रोख भरावे लागतील असे म्हटले होते. महिलेने एवढी रक्कम स्वतःकडे नसल्याचे सांगताच त्यांनी महिलेकडून सोन्याची पोत व कानातील बिऱ्या असा एकूण ३८ हजार रुपयांचा ऐवज घेवून पळ काढला.
दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे कळताच त्या महिलेने वरोरा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार दिली.

दीक्षांत समारंभ

Comments