टेमुर्डा येथे संकट मोचन क्रिडा मंडळ तर्फे भव्य कब्बडी सामन्याचे आयोजन करण्यात आले .या सामन्याचे उदघाटन श्री. अहेतेशाम अली - माजी नगराध्यक्ष न.प.वरोरा तथा जिल्हा सचिव भाजपा यांचा हस्ते करण्यात आले. या प्रसंगी अहेतेशाम अली यांनी सर्व कबड्डी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.आयोजकांना अतिशय उत्कृष्ठ असे कबड्डी सामने आयोजीत केल्याबद्द्ल संकट मोचक क्रिड़ा मंडळ,टेमूर्डा च्या सर्व टिम चे अभिनंदन केले. या कार्यक्रमात रमेशजी राजूरकर - निवडणूक प्र.भा.ज.पा.वरोरा विधानसभा, सतीशजी शेंडे - वनपरिक्षेत्र अधिकारी, चांभारे साहेब - राऊंड ऑफिसर वनपरिक्षेत्र टेमुर्डा,सुरेंद्रजी देठे, रजुपाटील तिखट, विलासभाऊ झिले - संचालक कृ.उ.बा.समिती वरोरा, डा.सरोदे, सोबतच टेमुर्डा येथील अनेक मान्यवर,क्रिडा प्रेमी आणी गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment