वरोरा हे सेवेचे शहर आहे. डॉक्टर विजय आईंचवार .रोटरी उत्सवाचे थाटात उद्घाटन

वरोरा हे सेवेचे शहर  डॉक्टर विजय आईंचवार 

रोटरी उत्सवाचे थाटात उद्घाटन


वरोरा 25/11/23
चेतन लुतडे 

सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असलेली रोटरी क्लब वरोर्याच्या वतीने रोटरी उत्सवाचे आयोजन  क्रीडा संकुल येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन रोटरियन आईचवार  व प्राध्यापक अभय टोंगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोटरी शाखा वरोराचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

रोटरी शाखा वरोरा च्या वतीने दरवर्षी रोटरी उत्सव वरोरा शहरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी या संस्थेचे आठवे वर्ष असून एक लाख स्क्वेअर फिट जागेवर भव्य दिव्य शामियान्यात रोटरी उत्सव सहा दिवसासाठी साजरा केला जात आहे. या उत्सवात खाण्यासाठी रेलचेल लहान मुलांसाठी खेळणी चे दुकाने , आकाश झुला, सह विविध कार्यक्रमाची आयोजन रोटरी क्लबच्या माध्यमातून होत आहे. यासाठी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर भेटी देण्यासाठी येतात. या सहा दिवसात अफाट गर्दी असलेल्या रोटरी क्लबच्या उत्सवाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांची व स्वतंत्र गार्डची व्यवस्था करण्यात येते.
या कार्यक्रमासाठी प्रास्ताविक रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर सागर वझे यांनी सादर केले. यावेळी त्यांनी रोटरी क्लबची रुपरेषा थोडक्यात समजावून सांगितली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले विजय आईंचवार सर यांनी रोटरी चे महत्व समजावून सांगत 40 टक्के महिलांसाठी रोटरी उत्सवात दुकानाचे गाळे देऊन त्यांच्याकडील वस्तूचे ब्रँडिंग शहरात करू शकले. ज्यामुळे नवीन रोजगाराच्या संधी रोटरी क्लबच्या वतीने निर्माण होऊ शकल्या . या रोटरी उत्सवातून मिळालेला फंड हा सामाजिक, शैक्षणिक कार्यासाठी व गरीब लोकांच्या मदतीसाठी वापरण्यात येत असतो.
 याच पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर रोटरीचे सामाजिक महत्त्व असून भारतामध्ये पोलिओ निर्मूलनासाठी रोटरीचा महत्त्वाचा वाटा आहे. अशा अनेक सामाजिक उपक्रमात रोटरी आपला सहभाग देत आहे.

वरोरा हे शहर सेवेचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे रोटरी क्लब वरोरा च्या वतीने  100 सायकल वाटप करण्याचा महत्वकांक्षी  निर्णय घेतला असून वरोरा तालुक्यातील मुलांना ह्या सायकली कार्यक्रमाच्या दरम्यान वाटप करण्यात येणार आहे.

या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित प्राध्यापक अभय टोंगे यांनी शैक्षणिक क्षेत्रात रोटरी क्लबला कोणतीही मदत लागल्यास सढळ हाताने मदत करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी रोटरी क्लबचे डीसी दादा जयस्वाल, वरोरा रोटरी क्लब शाखेचे अध्यक्ष डॉक्टर सागर वझे, सेक्रेटरी अँड. मधुकर फुलझले, बंडू देऊळकर, योगेश डोंगरवार, मनोज कोहळे, समीर बारई, होजेपा अली, प्राध्यापक मनोज जोगी,अमीत  नाहर आदी रोटरी सदस्य उपस्थित होते.

Comments