*वरोरा रेल्वे स्थानकावर जुन्या गाड्यांना पूर्ववत थांबा द्या**आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र*

*वरोरा रेल्वे स्थानकावर जुन्या गाड्यांना पूर्ववत थांबा द्या*


*आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र*

चंद्रपूर : वरोरा-भद्रावतीचे आमदार प्रतिभाताई  धानोरकर यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून वरोरा रेल्वे स्थानकावर जुन्या गाड्यांना पूर्ववत थांबा देण्याची मागणी केली आहे.

पत्रात धानोरकर यांनी म्हटले आहे की, वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात GMR, वर्धा पॉवर, वेकोली, एम्टा, अरविंदो कोल माईन्स यांसारखे मोठे उद्योग आणि भव्य जैन मंदिर व प्राचीन वास्तू शिल्पे आहेत. त्यामुळे या क्षेत्रात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण मोठे आहे. मात्र, कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या ट्रेनांचा स्टॉपेज वरोरा रेल्वे स्थानकावर अजूनही सुरु झालेला नाही. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
या पत्रात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी वरोरा रेल्वे स्थानकावर खालील रेल्वेगाड्यांचा स्टॉपेज सुरु करण्याची मागणी केली आहे:

 सिंकदराबाद - दानापूर ट्रेन नं. १२७९१ / ९२,  ग्रांड ट्रंक एक्सप्रेस ट्रेन नं. १२६१५ / १६, अहिल्यानगरी एक्सप्रेस ट्रेन नं. २२६४५ / ४६,  जयपूर एक्सप्रेस ट्रेन नं. १२९७५/७६, राप्ती सागर एक्सप्रेस ट्रेन नं. १२५११ / १२, संघमित्रा एक्सप्रेस ट्रेन नं. १२२९५ / ९६, धनबाद कोल्हापूर दिक्षाभुमी एक्सप्रेस ट्रेन नं. ११०४५/४६, संतरागाछी एक्सप्रेस ट्रे १२७६७/६८ या रेल्वे गाड्यांच्या समावेश आहे. 

या व्यतिरिक्त, नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस (११४०१-०२) नागपूरपर्यंत, जयंती जनता एक्सप्रेस, आनंदवन एक्सप्रेस, बल्लारपूर - वर्धा पॅसेंजर, बल्लारशाह - मुंबई सेवाग्राम लिंक एक्सप्रेस (मुंबईसाठी सीधी ट्रेन सुरू होईपर्यंत) या ट्रेनांचा स्टॉपेज पूर्ववत सुरु करण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली आहे.

Comments