तर सचिव पदी रवी शिंदे
चेतन लुतडे
वरोरा
दरवर्षी डिसेंबर महिन्यात मॉर्निंग वॉक ग्रुप तर्फे अध्यक्ष व सचिव पदासाठी निवडणूक घेण्यात येते. ही संस्था वरोरा येथील जुनी संस्था असून सामाजिक व आरोग्य हिताच्या दृष्टीने काम करीत आहे. आनंद निकेतन ग्राउंड मधील रोज सकाळी फिरायला येणाऱ्या युवकांची ही संस्था असून मागील वर्षी या संस्थेचे अध्यक्ष मांडवकर हे कार्यरत होते. यावर्षी या संस्थेचे 54 सदस्य असून वरोरा शहरातील नामांकित डॉक्टर्स इंजिनियर, वकील ,पत्रकार, बिझनेस मॅन ,उन्नतशेतकरी सदस्य म्हणून कार्यरत आहे.
यावर्षी अध्यक्ष पदासाठी धनंजय पिसाळ व दामोदर भाजपाले व सचिव पदासाठी अनिल पाटील आणि रवी शिंदे यांच्यात थेट लढत झाली. यामध्ये पिसाळ यांनी 34मते घेऊन सहज विजय मिळविला. तर सचिव पदासाठी रवी शिंदे यांनी 32 मते घेऊन एकहाती विजय मिळविला. मॉर्निंग वॉक ग्रुप तर्फे विजयी उमेदवाराचे अभिनंदन करण्यात आले. विजयी उमेदवारांना शरयू हॉटेल मधून चार चाकी वाहनावर फटाक्याच्या आतिषबाजी मध्ये मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मॉर्निंग वॉक ग्रुपचे सर्व सदस्य मोठ्या उत्साहात नाचत होते.
नवीन अध्यक्ष ने यावर्षी नवीन उपक्रम हाती घेऊन पूर्णत्वास न्यावा अशी सदस्यांनी आशा व्यक्त केली आहे.
या झालेल्या मॉर्निंग वॉक ग्रुपच्या निवडणुकीस वरोऱ्यातील नामांकित लोकांनी शुभेच्छा व्यक्त केले आहे.
निवडणुक अधिकारी म्हणून एडवोकेट मधुकर फुलझेले, पंकज नौकरकार, देवेंद्र गावंडे, बाबा आगलावे यांनी पाहिले. यानंतर विजयी उमेदवारास मॉर्निंग वॉक ग्रुप तर्फे सर्टिफिकेट देऊ सन्मान करण्यात आला.
Comments
Post a Comment