आदिवासी शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ करा : रविंद्र शिंदे**आदिवासी बांधवांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वसाधारण कर्ज उपलब्ध करून द्या*
*आदिवासी बांधवांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वसाधारण कर्ज उपलब्ध करून द्या*
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षा कडुन वरील मागणीचे निवेदन *विरोधी पक्ष नेते आदरणीय अंबादासजी दानवे* यांना निवेदन देण्यात आले.
आदिवासी बाधवाचे कर्जमाफी व कर्ज सवलत योजना सन २००८ या योजनेअंर्तगत कर्जमाफी योजनेचा मिळालेला नाही व सदर कर्ज अजुनही थकीत आहे. केंद्रशासनाच्या कृषि कर्ज माफी व कर्जसवलत अशा दोन घटंकाचा समावेश आहे.या कर्ज योजनेचा लाभ अजुन पर्यत आदिवाशी शेतकरी बाधवाना झाला नाही. आदिवाशी बाधवाचे सन २००८ कर्ज माफी व्हावी या करिता निव्वड राज्य सरकार मा. अप्पर आयुक्त व विशेष निबंधक सहकारी संस्था पुणे निव्वड 29/11/2023 व दि.६/१२/२०२३ ला वित्तीय संस्था सोबत पत्र व्यवहार करीत आहे.
तसेच आदिवाशी बांधवांची जमीनी या अहस्तांतरणीय असल्याने पीक कर्ज शिवाय कोणतेच कर्ज वित्तीय संस्था देत नाही व शासन नियमानुसार उपविभागीय अधिकारी यांचे कडुन नियमाने कार्यवाही करुन कर्ज मागणी केली असता वित्तीय संस्था कर्ज उपल्बध करुन देत नसल्याने अनेक समस्या या आदिवाशी बाधवांना समोर जावे लागत असुन त्याचे पाल्याना उच्चशिक्षणापासून सुध्दा वंचीत रहाव लागत आहे. त्यांना तात्काळ सन २००८ कर्ज माफी योजनेची सवलत द्यावी
तसेच साधारण कर्ज सुध्दा देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे विरोधी पक्ष नेते आदरणीय अंबादासजी दानवे, आमदार भास्करजी जाधव, आमदार सचिन अहेर, आमदार सुनिल शिदे साहेब यांना करण्यात आली. याप्रसंगी माझ्यासह राज्य कार्यकारणी सदस्य युवासेना हर्षलजी काकडे, पुर्व विदर्भ सचिव तथा गोडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य निलेश बेलखेडे, वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, भद्रावती तालुका प्रमुख नरेद्रं पढाल, खेमराज कुरेकार वरोरा शहरप्रमुख उपस्थित होते.
Comments
Post a Comment