वरोरा वासियांना खुशखबर....आज विद्यार्थ्यांसाठी आज बुगी उगी राष्ट्रीय नृत्य स्पर्धा मोफत असणारआई-वडिलांसाठी प्रत्येकी शंभर रुपये प्रवेश फी राहणार...रविवारी मेगा फिनाले थेट प्रक्षेपण बंद असणार.आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची कार्यक्रमाला सदिच्छा भेट..
आज विद्यार्थ्यांसाठी आज बुगी उगी राष्ट्रीय नृत्य स्पर्धा मोफत असणार
आई-वडिलांसाठी प्रत्येकी शंभर रुपये प्रवेश फी राहणार...
रविवारी मेगा फिनाले थेट प्रक्षेपण बंद असणार.
आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची कार्यक्रमाला सदिच्छा भेट..
वरोरा
चेतन लुतडे
वरोरा येथे पंधरा तारखेपासून सुरू असलेल्या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेचा आज शेवटचा दिवस असून या निमित्त वरोरा वासियांना खास सवलतीच्या दरात प्रवेश दिला जाणार आहे.
यासाठी पुरुष व महिलांना केवळ प्रत्येकी शंभर रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे या संधीचा वरोरा वासियांनी लाभ घ्यावा व भारताच्या विविध प्रांतातून आलेल्या नृत्य स्पर्धकांचा अविष्कार बघावा अशी विनंती आयोजक हॉटेल ग्रीनवे आणि बाबुलाल आईस्क्रीम यांनी केली आहे.
या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस असून थेट प्रक्षेपण बंद असणार आहे. आतापर्यंत लाईव्ह चंद्रपूर व मराठी चैनल वर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सुरू होते. दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांपर्यंत सर्व मुलांना मोफत मेगा फिनाले पाहायला मिळणार आहे.
रविवारी संध्याकाळी पाच वाजेपासून मेगा फिनाले ला सुरुवात होत आहे. भारतातील आसाम ,मुंबई, दिल्ली, हैदराबाद व इतर शहरातून स्पर्धक मोठ्या प्रमाणात वरोरा शहरात दाखल झाले आहेत. त्याचबरोबर वरोरा शहरातील स्पर्धक सुद्धा मेगा फिनाले मध्ये भाग घेणार आहेत. यामध्ये एकापेक्षा एक नृत्य स्पर्धक अलिशान मैदानात आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असणाऱ्या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
आयोजकांनी मेगा फिनाले साठी तगडी सुरक्षा व्यवस्था केली असून श्रोत्यांसाठी उत्तम खाण्याची स्टॉलची व्यवस्था केली आहे.
त्यामुळे वरोरा वाशियांसाठी आलीशान मैदानात रविवारची मेजवानी ठरणार आहे.
या स्पर्धेसाठी वरोरा भद्रावती विधानसभेचे आमदार प्रतिभाताई धानोरकर उपस्थित राहून. अशा भव्य आयोजनाबद्दल सर्व स्पर्धक व आयोजकांना शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी शहरातील पत्रकाराचा सत्कार ग्रीनवेचे मालक शुभम चिमूरकर व बाबूलाल आईस्क्रीम चे मालक निरज चौधरी यांच्याकडून करण्यात आले.
Comments
Post a Comment