बुगी बुगी ग्रँड फिनालेसाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीरभाऊ मूनगंटीवार यांची उपस्थिती

बुगी बुगी ग्रँड फिनालेसाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीरभाऊ मूनगंटीवार यांची उपस्थिती

वरोरा
चेतन लुतडे

मंत्री सुधीर मुनगंटीवार, वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य यांचा चंद्रपूर/गडचिरोली/नागपूर जिल्हा दौरा कार्यक्रम जाहीर झाला असून चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील बुगी उगी राष्ट्रीय नृत्य स्पर्धेसाठी उपस्थित राहणार आहेत. रविवार, दिनांक १७ डिसेंबर, २०२३ ला आलिशान मैदानात होत असलेल्या ग्रँड फिनाल्येसाठी सांस्कृतिक कार्य मंत्री यांची उपस्थिती असल्याने भारतातून आलेल्या स्पर्धकांचे मनोबल वाढनार आहेत.

आज राष्ट्रीय नृत्य स्पर्धेचे पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार असून गेल्या दोन दिवसापासून हि स्पर्धा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी लाईव्ह चंद्रपूर आणि मराठी टीव्ही वहिनी वरून थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले होते. आज ग्रँड फिनाले निमित्त विद्यार्थ्यांसाठी हा शो मोफत दाखवण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.




*मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य यांचा चंद्रपूर/गडचिरोली/नागपूर जिल्हा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे*

*रविवार, दिनांक १७ डिसेंबर, २०२३.*

*सकाळी १०.०० वा.*
*विशेष कार्यकारी अधिकारी व संजय गांधी निराधार योजनेच्या प्रमाणपत्र वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थिती*
*स्थळ: नियोजन भवन, चंद्रपूर.*

*सकाळी ११.३० वा.*
*मोटारीने चंद्रपूरहून गडचिरोलीकडे रवाना.*

*दुपारी ०१.०० वा.*
*गडचिरोली येथे आगमन व आर्य वैश्य समाज आयोजित माता कन्यका परमेश्वरी भूमीपूजन व कोनशिला समारंभास उपस्थिती.*
*स्थळ: शिवनेरी कॉलनी, आरमोरी, गडचिरोली.*

*दुपारी ३.०० वा.*
*मोटारीने गडचिरोलीहून चंद्रपूरकडे रवाना.*

*दुपारी ४.३० वा.*
*चंद्रपूर येथे आगमन व राखीव.*

*सायं. ०६.३० वा.*
*मोटारीने चंद्रपूरहून वरोराकडे प्रयाण.*

*सायं. ०७.०० वा.*
*वरोरा येथे आगमन व श्री. नितीन मत्ते यांनी आयोजित केलेल्या बुगीवुगी या राज्यस्तरीय कार्यक्रमास उपस्थिती.*
*स्थळः आलिशान लॉन समोरील मैदान, वरोरा, जि. चंद्रपूर*

*रात्री ०८.०० वा.*
*मोटारीने वरोरा, जि. चंद्रपूरहून नागपूरकडे प्रयाण.*

*रात्री १०.३० वा.*
*नागपूर येथे आगमन व मुक्काम.*

Comments