*शिवसेना चंद्रपुर जिल्हाप्रमुख मा. नितीनभाऊ मत्ते यांचे सूचनेनुसार चंद्रपूर तालुका व महानगर पालिका आढावा बैठक संपन्न!**शिवसेना चंद्रपूर तालुका व महानगर पालिकेत शाखा प्रमुख, बूथ प्रतिनिधी, व शिवदूत यांची नेमणूक करण्याच्या सुचना आशिष ठेंगणे जिल्हाप्रसिद्धी प्रमुख यांनी दिल्या*

*शिवसेना चंद्रपुर जिल्हाप्रमुख मा. नितीनभाऊ मत्ते यांचे सूचनेनुसार चंद्रपूर तालुका व महानगर पालिका आढावा बैठक संपन्न!*

*शिवसेना चंद्रपूर तालुका व महानगर पालिकेत शाखा प्रमुख, बूथ प्रतिनिधी, व शिवदूत यांची नेमणूक करण्याच्या सुचना आशिष ठेंगणे जिल्हाप्रसिद्धी प्रमुख यांनी दिल्या*

*चंद्रपुर :- शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथभाई शिंदे साहेब यांचे आदेशाने व पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख मा. किरणभाऊ पांडव यांचे मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख मा. दत्तात्रयजी पईतवार साहेब व शिवसेना चंद्रपुर जिल्हाप्रमुख श्री. नितीनभाऊ मत्ते यांचे सूचनेनुसार आशिष ठेगणे चंद्रपुर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख ( चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा विधानसभा क्षेत्र ) यांच्या उपस्थितीत शासकीय रेस्ट हाऊस,चंद्रपूर येथे दिनांक 03 नोव्हेबर रविवारला शिवसेना चंद्रपूर तालुका व महानगर पालिका आढावा बैठक संपन्न झाली.*

*सदर बैठकीला शिवसेना उपजिल्हा प्रमुख मा. कमलेशभाऊ शुक्ला, चंद्रपूर तालुका प्रमुख मा. संतोषभाऊ पारखी, चंद्रपुर महानगर प्रमुख मा. भरतभाऊ गुप्ता, प्रतिमाताई ठाकुर, वैद्यकीय कक्ष जिल्हा प्रमुख अरविंद धीमान, तालुका संघटक संजय शिंदे यांची प्रामुख्याने उपस्थित होते.*

*चंद्रपूर तालुका व महानगर पालिका आढावा बैठकीमध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख चदपूर मा.नितीनभाऊ मत्ते यांनी दिलेल्या सूचना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आशिष ठेंगणे यांनी कार्यकर्त्यांना देवून येणाऱ्या जि. प., पं. स. व महानगर पालिकेत शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील. तसेच मुख्यमंत्री मा. ना. एकनाथभाई शिंदे साहेब यांनी महाराष्ट्र सरकारद्वारे घेतलेल्या निर्णयाची माहिती मा. आशिष ठेंगणे यांनी आढावा बैठकीमध्ये दिली.*

*चंद्रपूर जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिका क्षेत्रामध्ये शिवसेना पक्ष वाढीसाठी प्रत्येक वार्ड, प्रभाग व सोसायटीच्या ठिकाणी शिवसेनेची शाखा निर्माण करून शाखा प्रमुख, बूथ प्रतिनिधी, व शिवदूत यांची नेमणूक करून पक्ष संघटन वाढवण्यासाठी विशेष भर द्यावा अशी जिल्हा प्रमुख मा. नितीनभाऊ मते यांनी दिलेली सूचना मा. आशिष ठेंगणे यांनी बैठकीमध्ये विशद केली. यावेळी उपतालुका प्रमुख सुरेश खापर्डे, अविनाश ऊके, गुरुदास मेश्राम, मुक्कद्दरसिंग बावरे, श्रेयांश ठाकूर, सुचक दखने, तरुण येनगटीवार, शैलेश सदलावार, रोशन वागदे, विश्वास खैरे, राजू ऐटलवार, राजू रायपुरे, अमोल टोंगे, संदिप तामटकर, वाणीताई सदलावार, गिता गडपेल्लीवार आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती*

Comments