स्थानिक गटबाजी मुळे पक्षाचा होत असलेले नुकसान तसेच युवासेना वरोरा-भद्रावती विधानसभा पदाधिकारी नियुक्ती करतांना विश्वासात न घेतल्याने मनीष जेठानी पदाचा राजीनामा दिला आहे.
युवासेना जिल्हाप्रमुख मनीष जेठांनी यांचा राजीनामा
वरोरा
चेतन लुतडे
युवा सेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर मनीष जेठाणी यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीना देऊन उद्धव बाळासाहेब गटातील शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना लक्ष देण्याचे आव्हान केले आहे.
वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची ताकत आहे क्षेत्रात आमदार निवडून येण्याची परिस्थिती असतांना काही महिन्यांपासून पालक संघटनेत गट बाजीला वेग आला आहे अनेक बदल करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी युवासेना वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील कार्यकारणीत देखील बदल करण्यात आले मात्र सदर बदल करतांना तसेच नवीन पदाधिकारी यादी बनविण्यात मनीष जेठानी यांना निलेशजी बेलखेडे यांनी विश्वासात न घेता सदर नियुक्ती करून घेतल्या.
जिल्हा प्रमुख राहून खालची कार्यकारणी विश्वासातली नसेल तर काम करण्यास अडचण होईल . काही पदाधिकारी पक्षात नसताना सुद्धा युवकांना पद बहाल करण्यात आले आहे.
या पदावर राहून पक्षाचे नुकसान बघू शकत नाही.
मला ११ महिने पक्षाने जिल्हा प्रमुख म्हणून जवाबदारी दिली या साठी सर्व वरिष्ठ नेत्यांचे मी मनापासून आभारी आहे.
या पत्रावर आपण दखल घेऊन गटबाजीला आळा घालाल तसेच या गटबाजी मुडे छोट्या कार्यकर्त्यांना होत असलेला त्रास कमी कराल ही विनंती करतो.
या आशयाचे पत्र वरिष्ठांना पाठवून वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील गटबाजीला दुजोरा मिळाला आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या गटातील कार्यकर्ते आता रवींद्र शिंदे यांच्या गटात गेल्याने हा वाद उफाळून आला होता.
नुकत्याच युवा सेनेच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये युवा सेना जिल्हा प्रमुख म्हणून मनीष जेठानी यांची नियुक्ती करण्यात आली होती.
त्यामुळे साधारण कार्यकर्त्यांना विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचा आदेश मानायचा की जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांचा आदेश मानायचा याच संभ्रमात साधारण कार्यकर्ता भरडला जात आहे.
Comments
Post a Comment