शेतकऱ्यांनी उत्पादन पॅटर्न बदलण्याची गरज - ना. नितीन गडकरीपहिल्या शेतकरी परिषद व कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन

शेतकऱ्यांनी उत्पादन पॅटर्न बदलण्याची गरज  - ना. नितीन गडकरी

पहिल्या शेतकरी परिषद व कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन 

वरोरा 

.     शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादक कंपन्या तयार करून या कंपन्यांमार्फत आपला शेतीमाल विकल्यास शेतकरी समृद्ध आणि संपन्न होईल. मात्र या कंपन्यातील शेतकऱ्यांनी कंपन्यात राजकारण करू नये आणि करायचे असेल तर त्यातून बाहेर पडून करावे असा सल्ला नामदार नितीन गडकरी यांनी यांनी वरोरा येथे शेतकरी परिषद व कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन करताना काढले.
 वैनगंगा व्हॅली शेतकरी उत्पादक महासंघ चंद्रपूर व जैन इरिगेशन सी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने वरोरा येथे आज 8 डिसेंबर रोज शुक्रवारला आयोजित पहिल्या शेतकरी परिषद व कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन नामदार नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.राष्ट्रीय मागासवर्ग स्वर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला आत्माच्या संचालिका प्रीती हिरळकर, चंद्रपूर जिल्ह्याचे कृषी अधिकारी शंकरराव तोटावार ,भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा ,माजी आमदार अतुल देशकर ,चंदनसिंग चंदेल, देवराव भोंगळे व वैनगंगा व्हॅली शेतकरी उत्पादक महासंघाचे संचालक यांचे सह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
            अरबी समुद्रातील पोर्ट प्रमाणेच आपण वर्धा जिल्ह्यातील सिंधी येथे एक पोर्ट तयार करत आहोत. येत्या एक ते दीड महिन्यात या पोर्टचे उद्घाटन होईल. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल आकर्षित पणे पॅकिंग करून या पोर्टच्या माध्यमातून पदेशात पाठवावा. जेणेकरून त्यांना अधिक आर्थिक लाभ होईल. त्यातून शेतकरी समृद्ध होईल. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नॅनो युरिया व नॅनो फर्टीलायझर याचा वापर करावा. जेणेकरून उत्पादन खर्चात घट होऊन अधिक उत्पादन येईल.पश्चिम महाराष्ट्राचा विकास उसाच्या माध्यमातून झाला. त्यामुळे पाणी व सिंचन  असलेल्या ठिकाणी उसाची लागवड जेवढी वाढवता येईल तेवढी करावी. उत्पादन खर्च करणाऱ्या या उत्पादन खर्च कमी करणाऱ्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
पाण्याच्या  जाणवणाऱ्या भीषण समस्येबद्दल बोलताना ते म्हणाले, धावणाऱ्या पाण्याला  चालवणे शिका, चालणाऱ्या पाण्याला थांबवा आणि थांबलेल्या पाण्याला जिरवा. यामुळे पावसाळ्यात जिरवलेले पाण्याचा उपसा उन्हाळ्यात करता येईल. आता शेतकऱ्यांनी शेतीमाल घेण्याचा पॅटर्न बदलण्याची आज गरज आहे. त्यांनी ग्रीन फ्युअलकडे आता वळावे.उसाचे तसेच जैविक उत्पादन ही घेण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न करावा म्हणजे आज अन्नदाता असलेला शेतकरी ऊर्जादाता बनेल व यातून त्याचा विकास होण्यास मदत होईल असेही नामदार महोदय  म्हणाले. 
           कार्यक्रम स्थळी मान्यवरांचे आगमन होताच त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शेतकरी परिषद व प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले या परिषदेत जिल्ह्यातील प्रगतिशील व होतकरू शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

Comments