वरोरा /चेतन लुतडे
राष्ट्रवादीचे भद्रावती तालुकाप्रमुख सुधाकर रोहनकर यांचे नेतृत्वात वरोरा उपविभागीय कार्यालयावर आज ड्रायव्हर चालकांनी निवेदन देऊन केंद्र सरकारचा निषेध नोंदविला आहे.
यावेळी चालकांनी नारेबाजी करीत रद्द करा रद्द करा जुलमी कायदा रद्द करा, मोदी शासन मुर्दाबादच्या घोषणा देत चालकांनी आपला संताप व्यक्त केला.
केंद्र शासनाने नवीन चालक कायदा पारित करीत चालकाच्या हातून अपघात झाल्यास दहा लाख रुपये दंड व दहा वर्षाची शिक्षा अशी तरतूद केली आहे. या कायद्याला त्वरित रद्द करण्याची मागणी ड्रायव्हर संघटनेने केली आहे. महाराष्ट्रात सगळीकडे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे या कायद्याचा निषेध नोंदवत संघटना रस्त्यावर उतरतील अशी धमकी सरकारला दिली आहे.
आधीच वाहन चालवीत असताना अनेक संकटांना ड्रायव्हरला तोंड द्यावे लागते.चालकांच्या वाहनाने अपघात झाल्यानंतर चालक जर घटनास्थळी थांबला तर त्याला जमावाकडून जीवे मारण्याची शक्यता असते.
तसेच चालक हा आर्थिकदृष्ट्या गरीब असल्याने तो दहा लाख दंड देऊ शकत नाही.दहा वर्षाची शिक्षा झाल्यास त्याचा कुटुंब उध्वस्त होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे या कायद्यांचा निषेध नोंदवत ड्रायव्हर संघटना उग्र झाले आहे.
Comments
Post a Comment