*वरोऱ्यात रंगणार डब्ल्यूएसएफ चषक राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धा*

*वरोऱ्यात रंगणार डब्ल्यूएसएफ चषक राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धा*


 वरोरा स्पोर्टस फाउंडेशन वरोरा (डब्ल्यूएसएफ)व लोकशिक्षण संस्था वरोडा यांचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा पुरुष गट व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन लोकशिक्षण संस्थेमधील व्हॉलीबॉल या खेळाला 51 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल लोकमान्य महाविद्यालय, वरोरा (स्व. मनोहरभाऊ पाटील क्रीडा परिसर) येथे दिनांक 1/02/ 2024 ते 4/02/2024 दरम्यान डब्ल्यूएसएफ चषक व्हॉलीबॉल स्पर्धा दिवस- रात्र पद्धतीने आयोजित करण्यात आलेली आहे. स्पर्धेकरिता चार मैदाने सज्ज करण्यात आलेली असून तीन मैदानावर विद्युत प्रकाश झोताची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील किमान 32 जिल्हा संघ सहभागी होतील. वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन वरोरा व लोकशिक्षण संस्था वरोडाचे यशस्वीपणे सलग सातवे आयोजन असून यानिमित्ताने वरोरा शहरात 380 खेळाडू व 80पदाधिकारी, पंच, प्रशिक्षक स्पर्धेच्या निमित्ताने दाखल होणार आहे. क्रीडा रसिकांसाठी ही स्पर्धा अभूतपूर्व मेजवानी ठरणार आहे.वरोरा स्पोर्टस फाउंडेशन व लोक शिक्षण संस्थेचे खेळाडू सतत दरवर्षी राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करतात. त्याचप्रमाणे सतत सलग राज्यस्तरीय, राष्ट्रीयस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. उद्घाटन प्रसंगी गडचिरोली जिल्हा क्रीडा अधिकारी श्री प्रशांत दोंदल यांचा सपत्निक सत्कार करण्यात येणार असून स्पर्धेचे उदघाटन  वरोरा विधानसभा क्षेत्राच्या लोकप्रिय आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री रवींद्रसिंग परदेसी साहेब( आयपीएस) हे असणार आहे. स्पर्धेचे स्वागताध्यक्ष लोक शिक्षण संस्था वरोडा चे अध्यक्ष  प्रा.श्रीकांत पाटील असून मुख्य पाहुणे म्हणून राजाराम बापू पाटील साखर कारखाना इस्लामपूर जिल्हा सांगलीचे चेअरमन व महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष श्री प्रतीक जयंत पाटील हे असणार आहे. पाहुणे म्हणून वरोरा चे माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, प्राचार्य  अशोकजी जीवतोडे सचिव,चांदा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर, लोकशिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण जी घड्याळपाटील ,वरोराच्या एसडीओ श्रीमती शिवनंदा लंगडापुरे, एसडीपीओ नयोमी साटम (आयपीएस), नागपूर विभागीय क्रीडा उपसंचालक श्री शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री अविनाश पुंड, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धा यशस्वी करण्याकरिता वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन वरोरा (डब्ल्यूएसएफ) चे अध्यक्ष गजानन जीवतोडे, किशोर पीरके, सुनील बांगडे , विनोद उंमरे, गोपाल नरोले, महाराष्ट्र वॉलीबॉल संघटनेचे सचिव विरल शहा व सर्व सहकारी प्रयत्न करीत आहेत.

Comments