वरोरा
चेतन लुतडे
वरोरा येथील आनंदवन चौक परिसरातील चिमूरला जाणारी वाहतूक काही वेळापूर्ती शाळकरी मुलींनी थांबवली.
आनंदवन चौक परिसरात चिमूर कडे जाणाऱ्या बसेस फार कमी आहेत. त्यामुळे विद्यार्थी मुलांना शाळेतून, महाविद्यालयातून परत जाताना बस पकडण्यासाठी रोज तारेवरची सर्कस करावी लागत आहे. या परिसरात बरेच कॉलेज शाळा महाविद्यालय आहेत. शेकडो विद्यार्थी या परिसरातू सकाळी आणि संध्याकाळी रोज जा करीत असतात.
संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान सगळे शाळा कॉलेज एकाच वेळेस सुटतात त्यामुळे या ठिकाणी बरीच गर्दी जमते. बसेस पहिलीच फुल भरून येतात. त्यामुळे आनंदवन चौकातून बसायला किंवा उभा राहिला सुद्धा विद्यार्थ्यांना जागा नसते. गेल्या कित्येक वर्षापासून हा त्रास विद्यार्थी सहन करत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बुधवारी संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान बस थांबवून एसटी महामंडळ मुर्दाबाद च्या घोषणा देत वाहतूक काही काळापर्यंत विद्यार्थिनी नी थांबवली.
यानंतर पोलीस प्रशासन येऊन विद्यार्थ्यांना समजावून या बसला पुढे पाठवण्यात आले. मात्र प्रश्न अजूनही सुटलेला नाही.
याव्यतिरिक्त बरेचसे प्रश्न अजूनही बाकी आहेत
वरोरा शहरापासून पन्नास किलोमीटर अंतराच्या आत असलेल्या गावांमध्ये बसेस बरोबर जात नाहीत. असल्यास एका बस मध्ये प्रवासी मावत नाहीत. त्यामध्ये विद्यार्थी हे आनंदवन चौकातून बसतात त्यामुळे त्यांना जागा होत नाही. विद्यार्थिनी या बसेसमध्ये धक्काबुक्की घेत कशातरी चढतात परंतु काही विद्यार्थिनी चढू शकत नाही त्यांना एखादा ऑटो किंवा खाजगी वाहन पकडून आपल्या गावात जावे लागते. त्यामुळे पालकांचा रोष सुद्धा रोज सहन करावा लागतो. ही स्थिती वरोरा शहरापासून असलेल्या परसोडा खातोडा ,चारगाव, वडगाव, मोखाडा, साखरा, अर्जुनी ,कोकेवाडा ,मुधोली, आष्टा, नागरी ,जामगाव, कोसरसर, सोनेगाव ,चंदनखेडा अशा अनेक गावातल्या विद्यार्थ्यांना सहन करावी लागत आहे. शाळेमध्ये उशिरा पोहोचावे लागते तर घरी वापस येतांनी संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत पोहोचल्याने पालकांचा रोज विद्यार्थीनी रोज सहन करीत आहे. वारंवार निवेदन देऊन सुद्धा हा तिढा सुटत नाही. त्यामुळे वैतागून विद्यार्थ्यांनी वाहतूक रोखून आपला निषेध व्यक्त केला.
वरोरा बस डेपोजवळ बसेस संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहे त्यामुळे बस हगाराने या संबंधित प्रश्नाकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे.
तीच परिस्थिती राहिल्यास एसटी महामंडळाच्या विरुद्ध विद्यार्थी आंदोलन करणार असल्याचे एबीव्हिपी संघटनेतर्फे सांगण्यात आले.
Comments
Post a Comment