भद्रावती
शिवसेना नेते किरण भाऊ पांडव यांचे सूचनेनुसार नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांनी स्थानिकांच्या रोजगार व वेतनाच्या मुद्द्यावर माननीय जिल्हाधिकारी विनयजी गौडा साहेब यांना निवेदन देऊन कर्नाटका एम्टा बरांज माईन्स मधील नारायणी सन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तर्फे कामगारांचा होत असलेल्या शोषणाबाबत कामगारांना मागील 80 दिवसापासून न दिलेल्या पगाराबाबत निवेदन सादर केले .जवळपास 125 कामगारांचे मागील 80 दिवसापासून वेतन कंपनीकडे थकीत आहेत यामुळे कामगारांवर उपासमारीची पाळी येऊन कामगारांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे .त्यांच्या पालनपोषणाची व शिक्षणाची अतोनात अवहेलना होत आहे . याची दखल घेऊन माननीय नितीन मत्ते यांनी कंपनीने कामगारांचे वेतन तत्काळ देण्यात यावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कंपनी विरोधात यलगार केला यावेळी प्रतिमा ताई ठाकूर महिला आघाडी जिल्हा प्रमुख चंद्रपूर व भरतजी गुप्ता महानगर प्रमुख चंद्रपूर हे उपस्थित होते
Comments
Post a Comment