नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांच्या प्रयत्नाने नारायणी सन्स इंडिया प्रा . लि . कंपनी कामगारांच्या चेहऱ्यावर फूलले हास्य*
नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांच्या प्रयत्नाने नारायणी सन्स इंडिया प्रा . लि . कंपनी कामगारांच्या चेहऱ्यावर फूलले हास्य*
भद्रावती
शिवसेना नेते किरण भाऊ पांडव यांचे सूचनेनुसार नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांनी स्थानिकांच्या रोजगार व वेतनाच्या मुद्द्यावर माननीय जिल्हाधिकारी विनयजी गौडा साहेब यांना निवेदन देऊन कर्नाटका एम्टा बरांज माईन्स मधील नारायणी सन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तर्फे कामगारांचा होत असलेल्या शोषणाबाबत कामगारांना मागील 80 दिवसापासून न दिलेल्या पगाराबाबत निवेदन सादर केले .जवळपास 125 कामगारांचे मागील 80 दिवसापासून वेतन कंपनीकडे थकीत आहेत यामुळे कामगारांवर उपासमारीची पाळी येऊन कामगारांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे .त्यांच्या पालनपोषणाची व शिक्षणाची अतोनात अवहेलना होत आहे . याची दखल घेऊन माननीय नितीन मत्ते यांनी कंपनीने कामगारांचे वेतन तत्काळ देण्यात यावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कंपनी विरोधात यलगार केला व कंपनीने तत्काळ २०/०१/२०२४ ला कामगारांच्या खात्यावर त्यांचा पगार जमा केला . यामुळे कंपनीच्या कामगारा मध्ये आनंदाचे वातावरण व नितीन मत्ते यांचे बद्दल आदरभाव ओसंडून येत होता सर्व कामगारांनी श्री नितीन मते यांचा भव्य सत्कार करण्याचा मानस बोलून दाखविला .
यावेळी श्री आशिष ठेंगणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, पंढरी एकरे, रियाज शेख, मनिष मडावी, मनोज परचाके, आनंद राजूरकर, संदिप डाहूले, अभय बोढाले, धिरज कूचनकर, तरबेज सिद्दीकी, नूर खांन, योगेश काकडे व कंपनीचे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते*
Comments
Post a Comment