शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात ईनकमिंग**पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश सुरूच...


*शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात ईनकमिंग*

*पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश सुरूच...*

*वरोरा तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील युवा, पुरुष व महिलांचा शिवसेनेत पक्षप्रवेश*

*शिवसेना विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचे नेतृत्व*

वरोरा : 
          तालुक्यातील वायगाव (खडतकर), वायगाव (भो.) येथील असंख्य युवा, पुरूष व महिलांनी विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात काल (दि.१०) ला पक्षप्रवेश घेतला.
         शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख नेते आमदार भास्करजी जाधव यांचे मार्गदर्शनात, पुर्व विदर्भ महिला संपर्क प्रमुख व विभागीय प्रवक्ता प्रा.सौ. शिल्पाताई बोडखे यांचे सुचनेनुसार, व वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचे नेतृत्वात तसेच चंद्रपूर जिल्हा संघटीका महीला आघाडी सौ. नर्मदाताई बोरेकर यांचे पुढाकाराने वायगाव (खडतकर) आणि वायगाव (भो.) येथील असंख्य युवा, पुरूष व महिलांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पक्षप्रवेश केला. 
          शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुखपदी रवींद्र शिंदे यांची नियुक्ती झाल्यापासुन शिवसेनेत नवचैतन्य संचारले आहे. ज्येष्ठ व युवा शिवसैनिकांना सोबत घेवून व कोणताही भेद न ठेवता पक्षावर निष्ठा असलेल्या सर्वांना सामावून घेवून त्यांचे कार्य करीत असल्याने सर्वांना पक्षात कार्य करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन असंख्य शिवसैनिक पक्षात पक्षप्रवेश घेतांना दिसत आहे. हिन्दुहदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी अंगीकृत केलेले ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या भूमिकेतून रविंद्र शिंदे या परिसरात शिवसेनेचे कार्य करीत आहे. पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक सतत जनतेच्या सेवेत असल्यामुळे जनतेचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यपद्धतीवर विश्वास वाढत आहे. 
       त्याच अनुषंगाने काल (दि.१०) रोज बुधवारला रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन वायगाव (खडतकर) आणि वायगाव (भो.) येथील सचिन जांभुळे, अमोल मन्ने, बंटी जांभुळे, राजकुमार कुबडे, कैलास जांभुळे, किसन मेश्राम, संजय जांभुळे, विलास जांभुळे, हनुमान मेश्राम, खुशाल मेश्राम, विठ्ठल भोयर, विकास मन्ने, विनोद मन्ने, गजानन जांभुळे, रमेश जांभुळे, शंकर भोयर, विकास जांभुळे, मंगेश मेश्राम, मारोती जांभुळे, सुरेश कामडी, राजु भोयर, संजय जांभुळे, स्वप्नील जांभुळे, शंकर भोयर, जितु कापटे, राजु जांभुळे, लिला मेश्राम, प्रतिभा जांभुळे, सोनु भोयर, कविता जांभुळे, वैशाली जांभुळे, वंदना जांभुळे, मंगळा जांभुळे, पोर्णीमा जांभुळे, वनिता जांभुळे, पायल गोहणे, सोनु जांभुळे, इंदिराबाई गोहणे, मंदाबाई मन्ने, आशाबाई ठाकरे, बकाबाई बावणे, देवता ठाकरे, संगिता मन्ने, सुंदराबाई जांभुळे, वर्षा मन्ने, निर्मला जांभुळे, हिराबाई कामडी, सोनाली गोहणे, रत्नमाला जांभुळे, रेवती भोयर, सुनंदा मेश्राम, कगु बावणे, सोनु मन्ने, शामकलाबाई जांभुळे व इतर अनेक युवा, पुरूष व महिलांनी शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केला.
             याप्रसंगी शिवसेना वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र  शिंदे, वरोरा शिवसेना तालुका प्रमुख दत्ताभाऊ बोरेकर, विभाग प्रमुख बोर्डा-शेगाव जि.प.क्षेत्र, चंद्रशेखर कापटे, शिवसेना शेगाव शहर प्रमुख प्रमुख, गजाननजी ठाकरे, अनिल सिंग, शिवसेना उपशहर प्रमुख, वरोरा, पवन महाडीक, शिवसेना ट्रान्सपोर्ट युनियन वरोरा, विजय नन्नावरे, सरपंच ग्रा.प.वायगाव, शंकर भोयर, पोलीस पाटील वायगाव ख., विजयजी गाठले, अर्चनाताई कामडी, अध्यक्षा यशोधन फाऊडेशन, चंद्रपूर, निलिमा आडे, पोलीस पाटील वायगाव भो., तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments