अरबिंदू कंपनी आणि ग्रामस्थ यांच्यातील जमीन दर निश्चित बैठक असफल ठरली.

अरबिंदू कंपनी आणि ग्रामस्थ यांच्यातील जमीन दर निश्चित बैठक असफल ठरली.

वरोरा
चेतन लुतडे 

भद्रावती तालुक्यातील बेलोरा  गावात अरबिंदू रियालटी इन्फ्रास्ट्रक्चर या खाजगी कंपनीचे कोळसा उत्खनन करण्याचे काम फेज वन ओपन कास्ट सुरू होत आहे. या कंपनीला 936 हेक्टर चे अधिकरण करून कोळसा उत्खनन करण्यासाठी आवटन केले आहे. नियमानुसार भूमी अधिग्रहण व त्यासंबंधीचा मोबदला कंपनी आणि गावकरी यांच्यामध्ये होणार असून यामधील दुवा म्हणून प्रशासकीय यंत्रणा काम पाहत आहे. मात्र वारंवार चर्चा करून सुद्धा भूमी अधिग्रहणाचा मोबदला देण्याचे प्रयत्न असफलच ठरत आहे. गावकऱ्यांनी 50 लाख रुपये एकर ही एक मागणी समोर केली मात्र कंपनी या मागणीसाठी नकार देत असून 23 लाख रुपये एकर जमीन मोबदला देण्याचे शेतकऱ्यांना कळविले आहे. मात्र शेतकऱ्यांची मागणी ही अधिकची असून यासाठी वारंवार चर्चा घडवून येत आहे.

भद्रावती पासून जवळ असलेल्या एका कोळसा खदानीमध्ये शेतकऱ्यांच्या जमीनीला 25 लाख रुपये एकर प्रमाणे मोबदला देण्यात आला. त्यामुळे आता 4 वर्षानंतर शेतकऱ्यांच्या जमिनीला किती भाव दिला पाहिजे असा सवाल उपस्थित अधिकाऱ्यांना करताच उपजिल्हाधिकाऱ्यांनी या विषयातून काढता पाय घेतला.

गावकरी अरविंद कंपनीसोबत डायरेक्ट चर्चा करायला तयार आहेत मात्र कंपनी सर्वजणांसमोर जमीन मोबदल्याबाबत चर्चा करण्यासाठी राजी होत नाही. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जोपर्यंत पूर्णतः 936 हेक्टर जमीन अधिग्रहण मोबादला शेतकऱ्यांना मिळत नाही  तोपर्यंत कंपनीने काम करू नये अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. 
यासाठी वरोरा येथील उपविभागीय कार्यालय येथे जिल्हा अधिकारी यांच्या नेतृत्वात बैठक घेण्यात आली यावेळी कंपनीतर्फे व गावकऱ्यासोबत अधिकाऱ्यांसमोर चर्चा करण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी कार्यालयातून दगडूजी कुंभार , उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे , उपविभागीय पोलीस अधिकारी नोअमी साटम, उपस्थित होत्या. मात्र ही चर्चा असफलस ठरली. 

दुसरीकडे कंपनीने आपले काम 170 हेक्टर वर सुरू केले असून प्रशासनिक मंजुरी मिळवून हे काम सुरू केल्याने गावकऱ्यांनी त्याचा विरोध केला आहे.
त्यामुळे गावकऱ्यांनी उठाव करून या कंपनीचे काम बंद पाडले आहे.

ग्रामपंचायत टाकळी व बेलोरा येथील ग्राम समितीतील अध्यक्ष  प्रवीण शामराव मते ,उपाध्यक्ष- प्रशांत पांडुरंग मते आणि सचिव -संदीप जनार्दन आगलावे , बेलोरा गाव समिती कार्याध्यक्ष विलास नामदेव परचाके, ग्रामपंचायत पानवडाळा येथील सरपंच प्रदीप महाकुलकर , सरला ठोंबरे, शालू वैद्य, अर्चना मते ,अलका बुच्चे ,जाईबाई मते किरण आगलावे ,रसिका देहारकर , विकास पंडीले ,मनोज मते इत्यादी शेतकरी उपस्थित होते.
कॅरम स्पर्धा वरोरा

Comments