कल्पतरू सोशल क्लब तर्फे २ पासून वरोऱ्यात फन फेस्टचे आयोजन*उत्सव नागरिकांसाठी मेजवानी ठरणार

कल्पतरू सोशल क्लब तर्फे २ पासून वरोऱ्यात फन फेस्टचे आयोजन
*उत्सव नागरिकांसाठी मेजवानी ठरणार

वरोरा : येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या कल्पतरू सोशल क्लबच्या वतीने २ फेब्रुवारी पासून फन फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांसाठी एक प्रकारे आनंददायी ठरणाऱ्या सदर उत्सवाचे उदघाटन आनंदवन येथिल मुक बधीर विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
तालुका क्रीडा संकुलच्या प्रांगणावर २ ते ७ फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या या कार्यक्रमाच्या प्रारंभी
  दिल्ली येथिल सुप्रसिध्द १० फुट उंचिचे "बाहुबली हनुमानजी" यांची ढोल ताशांच्या गजरात व संगीताच्या तालात भव्य मिरवणुक दुपारी ३ वाजता गांधी चौक ते आंबेडकर चौक अशी काढण्यात येणार आहे.
सदर उत्सवा दरम्यान दररोज प्रसिध्द गायिकांच्या गाण्याची मेजवाणी व लावणी नृत्य आणि विविध मनोरंजनात्मक कार्यकम सादर केले जाणार आहे. 
तसेच विविध नामांकित चारचाकी व दुचाकी वाहन कंपन्यांचे स्टॉल्स आणि अनेक कमर्शीयल स्टॉल यांची विशाल प्रदर्शनी या उत्सवात ‌असणार आहे. सोबतच नागरिकांसाठी पंजाबी, राजस्थानी, वऱ्हाडी , इटालीयन, चायनीज, आईस्कीम, मॉकटेलस व अनेक खाद्यपदार्थाची मेजवानी ठरणार आहे.
या उत्सवात मुलांच्या मनोरंजनासाठी टोराटोरा, ड्रॅगन, चांदतारा, गगणचुंबी झुले अशा अनेक प्रकारच्या राईडस ची व्यवस्था कल्पतरू सोशल क्लबच्या वतीने करण्यात आली आहे. कोरोना दरम्यान काही वर्ष वगळता दरवर्षी तालुका क्रिडा संकुल वरोरा येथे कल्पतरू फन फेस्टचे आयोजन करण्यात येत असते. या वर्षी दि २ ते ०७ फेब्रुवारी पर्यत हे आयोजन असणार आहे. 
या फन फेस्टचे उदघाटन दि. ०२ फेब्रुवारी सांय ०७ वाजता आनंदवन येथील - मुक बधीर विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कल्पतरू फन फेस्ट आयोजनाचे हे  ३ रे वर्ष असुन यावर्षी हा उत्सव एक लाख पन्नास हजार वर्ग फुटामध्ये आयोजीत केलेला आहे. बालकांपासून तर वृद्धांपर्यंत संपुर्ण परीवाराला आकर्षीत करण्यासाठी मनोरंजन पार्क, गायन नृत्य व स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे. कल्पतरू सोशल क्लब द्वारा तालुक्यातील सदर फन फेस्ट करिता वर्ग १ ते ४ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पास वितरित करण्यात आले आहे. या उत्सवा दरम्यान शहरातील विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. नागरिकांनी अधिकाधिक संख्येने या उत्सवाला भेट देऊन उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन कल्पतरू सोशल क्लब तर्फे आज दि.३१ जानेवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेतून करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला राजू महाजन, चेतन शर्मा, शशी चौधरी, होजप्पा अली, दर्शन मालू ,परीक्षित एकरे, रवी नरूले, तरुण वैद्य, निकेश संचेती, नीरज चौधरी, प्रणय मालू यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.



Comments