भद्रावती येथे हुतात्मारक पासून ओबीसी महामोर्चाची भव्य जनजागृती बाईक रॅली!**महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन*

*भद्रावती येथे हुतात्मारक पासून ओबीसी महामोर्चाची भव्य जनजागृती बाईक रॅली!*

*महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन*.

अतुल कोल्हे भद्रावती :- 
                     मराठा समाजाला ओबीसी खोट्यातून आरक्षण देऊ नये, मराठ्यांच्या ओबीसीत झालेला घटनाबाह्य समावेश तात्काळ रद्द करण्यात यावा, जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे, मराठा आरक्षणा संबंधित आलेला अध्यादेश रद्द करावा या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यासाठी दिनांक सात रोज बुधवारला जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे .या महामोर्चा बद्दल ओबीसी समाजात जनजागृती करण्यासाठी तसेच या महामोर्चात शहर तथा तालुक्यातील ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे याबाबत जनजागृती करण्यासाठी ओबीसी महासंघातर्फे दिनांक 6 रोज मंगळवार ला शहरातील नाग मंदिर चौकात छत्रपती शिवाजी महाराज, भगवान गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे व वंचित आघाडीचे कुशल मेश्राम यांचे शुभ हस्ते मालार्पण करून बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली. .सदर जनजागृती रॅली शहरातील प्रमुख तथा अंतर्गत रस्त्यांमधून काढण्यात आली  या रॅलीच्या माध्यमातून शहरातील ओबीसी बांधवांना महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले शक्ती प्रदर्शन दाखवावे असे आवाहन करण्यात आले याशिवाय तालुक्यातील ग्रामीण भागातही या महामोर्चात सहभागी होण्यासाठी विविध गावात जाऊन जनजागृती करण्यात आली .सदर बाईक रॅलीत माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, ज्ञानेश्वर डुकरे, खुशल मेश्राम ,पांडुरंग टोंगे, शिवसेना जिल्हाप्रमुख उबाठा जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे, आदिवासी नेते रमेश मेश्राम, सुरज गावंडे, सुनील आवारी, सुनील खोब्रागडे ,सुधीर सातपुते, प्रफुल चटकी, लीमेश माणूस मारे ,सुधीर पारधी, सुनील बिपटे ,मनोहर नागपुरे, वासुदेव सातारकर, वसंता उंमरे, वंदना धानोरकर, सुनंदा डुकरे, रेखा कुटेमाटे, कविता सुपी, लक्ष्मी पारखी ,विभा बेहेरे, टोंगे मॅडम, कवडृ मते, सुनील वैद्य, मोरेश्वर आवारी आदींसह हजारोच्या संख्येने ओबीसी महिला तथा बांधव सहभागी झाले होते.

Comments